डाऊच खु॥ गावात शिवराणा हेल्थ क्लब चे उदघाटन!!


डाऊच खु॥ गावात शिवराणा हेल्थ क्लब चे उदघाटन!!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील डाउच खु॥या गावात पैलवान.तान्हाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मा. श्री.राजाभाऊ झावरे (शिवसेना जिल्हा प्रमुख अहमदनगर ) यांच्या शुभहस्ते शिवराणा हेल्थ क्लब चे उदघाटन करण्यात आले. 

    या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन नितीन भाऊ औताडे ( शिवसेना नेते),सुनील भैय्या  तिवारी ( युवा सेना   सहसचिव ) प्रमोद आण्णा लभडे ( शिवसेना नेते ),शिवाजीराव ठाकरे (तालुकाप्रमुख कोपरगाव), कैलासभाऊ जाधव( उपजिल्हा प्रमुख),भरतभाऊ मोरे ( मा.शहरप्रमुख ), कलविंदर डडीयाल   

(शहरप्रमुख कोपरगाव ) , बाळासाहेब राहणे ( पं.स. सदस्य ),प्रफुल्ल शिंगाडे (उपशहर प्रमुख कोपरगाव ) हे उपस्थित होते .

 यावेळी  राजाभाऊ झावरे, प्रमोद आण्णा लभडे, भरतभाऊ मोरे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  लोकनियुक सरपंच संजय गुरसळ आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि

  “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे”.मात्र आजकाल सुखवस्तू जीवनशैली आणि पैसे कमाविण्याची शर्यंत यांच्यामागे धावता माणसाला निरोगी आयुष्य दुर्मिळ झाले आहे. हिंदीमध्ये ‘शिर सलामत तो पगडी पचास’ अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे जर शरीर सुदृढ असेल तरच जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींचा आनंद आपण लुटु शकतो.त्यासाठी व्यायाम ही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले

     शेवटी उपस्थितांचा सत्कार  लोकनियुक सरपंच संजय गुरसळ यांनी केला. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य शंकर गुरसळ,सलिम भाई शेख, बाळासाहेब गुरसळ, रावसाहेब पवार, योगेश पवार, देवा पवार, पंकज पुंगळ, मुन्ना सय्यद, मानिक चव्हाण, संदिप पवार, शशिकांत पवार, अजित जाधव, योगेश पगारे, बंट्टी पवार, राहूल बढे, बाबासाहेब बढे, चंद्रकांत गुरसळ, सुनील गुरसळ, तसेच ग्रामसेवक पाडेकर, भाऊसाहेब  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपसरपंच दिगंबर पवार यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News