सदा बंद पोलिस चौकी ? पोलिस कुठंआहे ?


सदा बंद पोलिस चौकी ? पोलिस कुठंआहे ?

सतरा कमानी पोलिस चौकीत पोलिसचं नाही ही फक्त नावा पुरतीच का ...?

शिरुर शहरातील नागरिकांकडून संतप्त सवाल ?

शिरुर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे)

          संपुर्ण देशात करोना, करोना या संसर्गचा प्रादूर्भाव सर्वत्र वाढतचं असताना ह्याचे गांभिर्य लक्षात न घेता या करोना संसग्र विषाणुचा वाढता प्रदुर्भाव पाहुन शिरुर शहरात नव्हे तर संपुर्ण जगात नकळत इतका वाढला असताना अहमदनगर जिल्हा आणि शिरुर शहर व पुणे जिल्हा याला जोडणार्या घोडनदीच्या ऐतिहासिक असलेल्या सतरा कमाणी येथील पोलिस चौकीत कायदा सुव्यवस्थेच्या दॄष्टीने कायम स्वरुपी करण्यात यावी अशी मागणी होत असुन जर सुरु झाली नाही तर पोलिस व प्रशासनाच्या अंदागोदी कारभाराच्या विरोधात आंदोलनचं करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्यावतीने शिरुर शहराध्यक्ष अप्पासाहेब रंगनाथ ढवळे यांनी दिला.

     अहमदनगर जिल्हा व पुणे जिल्हा याला जोडणारी घोडगंगा नदी यावर असलेला हा पुल ऐतिहासिक पुल असुन शिरुर शहर नव्हे तर पुणे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असताना कोणत्याही पध्दतीची कायदा सुव्यवस्था राबवली जात नाही. फक्त जन सामान्याना व समाजाची दिशाभूल करण्यासाठी जर शिरुर पोलिस स्टेशन अंतर्गत सुरु झालेली ह्या पोलिस चौकीत कोणताही सद्या पोलिस कार्यरत नाही.

       सतरा कमानी पोलिस चौकीत कायम पोलिस कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.शिरुर शहरातील नागरिकांकडून होत असलेल्या मागणीकडे पोलिस व प्रशासन यांकडून जाणिवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिरुर शहरातील नागरिकांकडून उमटत असल्याचे निदर्शनात येत आहे. तरी प्रशासनानी याची दखल घेऊन सद्या सदा बंद असलेल्या सतरा कमानी

पोलिस चौकीत पोलिस कर्मचारी कायम स्वरुपी नियुक्त करण्यात यावी अशी मागणी होत असताना ही देखिल जर त्या ठिकाणी सतरा कमानी पोलिस चौकीत पोलिस कर्मचारी कायम स्वरुपी नियुक्त होत नसेल तर प्रशासनाच्या अंदागोदी कारभाराच्या विरोधात आंदोलनचं करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्यावतीने शिरुर शहराध्यक्ष अप्पासाहेब रंगनाथ ढवळे यांनी दिला.

             शहरातील सतर्क नागलिकांनी आपली व आपल्या कुटूंबीयाची काळजी घेऊन बाहेर न पडता करोना या संसग्र विषाणुचा नाश करण्यासाठी शासनाला या लढाईत सर्वानी सहकार्य करावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे व आखिल भारतिय माहिती सेवा समितीचे शिरुर शहराध्यक्ष अप्पासाहेब ढवळे यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News