श्री.सावता माळी युवक संघाचे वतीने कोपरगावात ह.भ.प.भीमराज महाराज जाधव यांचा सत्कार !!


श्री.सावता माळी युवक संघाचे वतीने कोपरगावात ह.भ.प.भीमराज महाराज जाधव यांचा सत्कार !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कोपरगाव शहर सप्ताह व दिंडीच्या प्रमुखपदी ह.भ.प.श्री.भीमराज महाराज जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

तीन वर्षांसाठी ही निवड आहे.अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ. प.श्री.प्रकाश महाराज बोधले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.श्री.अनिल महाराज वाळके आणि नगर जिल्हाध्यक्ष ह.भ.प.श्री.गणेश महाराज डोंगरे यांनी तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे.

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नियमावलीनुसार जाधव महाराज यांना वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार,दिंडी व अन्य कामे करावयाची आहेत.जाधव महाराज हे गेल्या तीन दशकांपासून महाराष्ट्रभर प्रवचन आणि कीर्तने करीत आहेत.त्यांनी कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर भागात दक्षिणमुखी हनुमान मंदिराची उभारणी केली आहे.अनेक सामाजिक कामांत त्यांचा नेहमी सहभागी असतात.

या पाश्र्वभुमीवर श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य कोपरगाव शहर अध्यक्ष श्री.शेखरजी बोरावके यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्यचे  जिल्हा ऊत्तर अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे श्री.मुकुंद मामा काळे,कोपरगाव तालुका सचिव श्री.योगेशजी ससाणे, श्री.स्वप्निलजी कोपरे व कु.शंकरजी पुंड उपस्थित होते. ह.भ.प.श्री.भीमराज महाराज जाधव यांचे अभिनंदन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रदीपजी नवले,कोपरगाव नगरपालिका नगरसेवक श्री.वैभवजी गिरमे,कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री.अशोकजी माळवदे,ऊपाध्यक्ष श्री.संतोषजी रांधव,कार्यअध्यक्ष श्री.डाॅ.मनोजजी भुजबळ,संपर्क प्रमुख श्री.संदीपजी डोखे,शहर ऊपाध्यक्ष श्री.मनोजजी चोपडे,श्री.अनंतजी वाकचौरे यांनी जाधव महाराज यांचे अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News