१ नोव्हेंबर हा श्रीगोंदे तालुक्यासाठी कोरोना बाबतीत सुवर्ण दिन : प्रा.दरेकर


१ नोव्हेंबर हा श्रीगोंदे तालुक्यासाठी कोरोना बाबतीत सुवर्ण दिन : प्रा.दरेकर

श्रीगोंदा:-   अंकुश तुपे श्रीगोंदे:

तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दिनांक १० मार्च २०२० रोजी तपासला पण तो निगेटिव्ह आला. त्यानंतर थेट २५ जून २०२० रोजी कोरोनाचे ११९ रुग्ण तपासले. त्यापैकी आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले. श्रीगोंदे तालुक्यात आठ रुग्णांपासून  सुरू झालेली कोरोना रुग्णांची संख्या दि.३१ ऑक्टोबर २०२० रोजी २ हजार २०२ वर गेली. परंतु दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी श्रीगोंदे तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. खऱ्या अर्थाने  हा श्रीगोंदे तालुक्याचे बाबतीत सुवर्ण दिन म्हणावा लागेल. अशी प्रतिक्रिया कोरोनाची अद्यावत आकडेवारी ठेवणारे प्रा. तुकाराम दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

प्रा. दरेकर म्हणाले, आतापर्यंत श्रीगोंद्याच्या ११५ गावांपैकी ९४ गावांत २ हजार १८९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तालुक्या बाहेरील कोरोनाच्या १३ रुग्णांनी श्रीगोंदे तालुक्यात उपचार घेतले. त्यामुळे कोरोनाची एकूण संख्या २ हजार २०२ झालेली आहे. 

 सुदैवाने श्रीगोंदे तालुक्यातील अजूनही २१ गावांनी कोरोना पूर्णपणे रोखलेला आहे. या २१ गावांनाही नक्कीच धन्यवाद दिले पाहिजेत. श्रीगोंदा तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण  २ हजार २०२ रुग्ण आढळले असून, त्यामध्ये १४२६ पुरुष आणि ७७६ महिलांचा समावेश आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २ हजार १२८ असून, बाधित रुग्णांशी बरे होण्याचे प्रमाण ९६.६४ टक्के आहे. सध्या चाळीस रुग्ण उपचार घेत असून, त्यांचे बाधित रुग्णांशी प्रमाण १.८२ टक्के आहे. आतापर्यंत श्रीगोंदे तालुक्यात ३४ मृत्यू झाले आहेत. बाधित रुग्णांशी मृत्यूचे प्रमाण १.५४ टक्के आहे.

 श्रीगोंदा तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर व  त्यांचे सर्व आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिस यंत्रणा यांच्या प्रयत्नामुळे श्रीगोंदे तालुक्यात आज कोरोनाची रुग्णसंख्या निरंक आलेली आहे. आजचा दिवस श्रीगोंदे तालुक्यासाठी सुवर्ण दिन मानला पाहिजे. असे सांगून प्रा. दरेकर म्हणाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीगोंदे तालुक्यातील कोरोनाची अचूक अद्यावत माहिती  वेळेवर दिलेली आहे. त्याबद्दल त्यांनाही श्रीगोंदा तालुक्याचे वतीने धन्यवाद दिले पाहिजेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News