महाराष्ट्र नाभिक महामंडळ महिला जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर


महाराष्ट्र नाभिक महामंडळ महिला जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर

 -महाराष्ट्र नाभिक महिला जिल्हा व शहर कार्यकारिणीतील नूतन पदाधिकार्‍यांना नियुक्तीचे पत्रे देण्यात आली. याप्रसंगी  ब्युटी पार्लर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा अनुजा कांबळे, जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे व शहराध्यक्षा स्वाती पवळे, बाळासाहेब भुजबळ, माऊली गायकवाड, बापूसाहेब औटी, निलेश पवळे, संदिप वाघमारे, अनिल निकम, बाबूराव ताकपिरे, श्रीरंग गायकवाड, योगेश पिंपळे, रमेश बिडवे, आदिनाथ बांगर आदि. (छाया : विजय मते)

महिला स्वत:च्या अस्तित्वाची जाणिव करुन देण्यासाठी आता प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहे - अनुजा कांबळे

नगर( -प्रतिनिधी संजय सावंत) आज महिलांना विविध क्षेत्रात सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतीक कार्यात आंतर मनातून आत्मविश्‍वासाने कार्य करतात. स्वत:च्या अस्तित्वाची जाणिव करुन देण्यासाठी आज त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत, असे प्रतिपादन ब्युटी पार्लर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा अनुजा कांबळे यांनी केले.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ महिला जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर करुन नूतन पदाधिकार्‍यांना नियुक्तीची पत्रे सौ.कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.  याप्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष माऊली गायकवाड, कार्याध्यक्ष विशाल सैंदाणे, सचिव बापूसाहेब औटी, युवा जिल्हाध्यक्ष निलेश पवळे, शहराध्यक्ष श्रीपाद वाघमारे, युवा प्रसिद्धी प्रमुख संदिप वाघमारे, अनिल निकम, पंच कमिटीचे सदस्य बाबूराव ताकपिरे, श्रीरंग गायकवाड, जीवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पिंपळे, रमेश बिडवे, आदिनाथ बांगर आदि उपस्थित होते. 

सौ.कांबळे पुढे म्हणाल्या, महिलांना सबला करणे, समान हक्के देणे या उद्देशाने नाभिक महामंडळामध्ये आज कार्यकारिणी  जाहीर केली आहे. स्त्रीयांवरील अन्याय दूर करणे, समाजात समानतेबरोबरोच पुरुषांच्या बरोबरीने काम करुन वेगळे स्थान निर्माण करणे हा उद्देश असल्याचे सांगितले.प्रास्तविकात बाळासाहेब भुजबळ यांनी नाभिक समाजातील महिला स्वत: पुढे येत असून, सामाजिक क्षेत्रात काम करुन विविध क्षेत्रात ठसा उमटवितात, त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे व शहराध्यक्षा स्वाती पवळे यांनी महिला महामंडळाचे कार्य प्रगतीपथावर नेले. नवीन कार्यकारिणी जाहीर करुन महिलांना अजून काम करण्याची संधी दिली असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ महिला जिल्हा व शहर कार्यकारीणमध्ये जिल्हा उपाध्यक्षापदी सुलभा सटाणकर, कार्याध्यक्ष रोहिणी हिरे, सचिव शुभांगी वाघमारे, संघटक शुभांगी पवळे, प्रसिद्धीप्रमुख शितल वाघमारे यांची तर शहर उपाध्यक्ष ज्योती कासवत, कार्याध्यक्ष कांचन शिंदे, सचिव प्रतिक्षा खंडागळे, संघटक सविता सोन्नीस आदिंची निवड करण्यातसूत्रसंचालन बापू औटी यांनी केले तर आभार निलेश पवळे यांनी मानले. यावेळी महिलांसह समाज बांधव उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News