वावरहिरे येथे आशा वर्कर्स व डॉ.येवले व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सत्कार संपन्न


वावरहिरे येथे आशा वर्कर्स व डॉ.येवले व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सत्कार संपन्न

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: वावरहिरे- वावरहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे वावरहिरे परिसरात  नव्याने कोरोना रुग्ण तयार होऊ नयेत व वेळीच उपचार व्हावेत म्हणून गरोदर महिला,बी.पी.,शुगर आणि 60 वर्ष वरील नागरिक व इतर यांना  प्राधान्य क्रम देऊन रॅट-रॅपिड अँटीजन टेस्ट शिबिर दि.31 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यन्त वावरहिरे प्राथमिक शाळेत आयोजित केले त्यावेळी 45 नागरिकांनी न घाबरता तपासणी केली त्यामध्ये 44 लोक निगेटीव्ह आढळले. एक जणास पुढील योग्य ती सूचना देऊन काळजी घेण्यास सांगितले. या टेस्ट मध्ये सरपंच चंद्रकांत वाघ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस रघुनाथ ढोक यांनी  टेस्ट करून घेतली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियान अंतर्गत  व वावरहिरे ग्रामपंचायत तर्फे कोव्हिड 19 मध्ये  घरोघरी जाऊन आशा वर्कर कविता अवघडे, राजेश्री जाधव,उमा बोराटे,लता जाधव,उषा कवळे, गट प्रवर्तक अश्विनी बोराटे आणि उत्तम प्रकारे प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीडी चालवून डॉ.दीपक येवले,  आरोग्य सेविका श्रीमती.एस.एन.सोनवलकर सह उत्तम सेवा देऊन  नावलौकिक मिळवून आरोग्य सेवा देत असल्याने तसेच  औषधें व इतर सर्व साहित्य मिळवून देणारे मार्डी चे आरोग्य सहाय्यक नितीन खुळे या सर्वांचा  कोरोना योद्धा  व आजचे शिबिर यशस्वी केलेबद्दल सरपंच चंद्रकांत वाघ व रघुनाथ ढोक यांच्या हस्ते व बबनराव खुसपे,राजू मुळे यांचे उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज,डॉ.आंबेडकर क्रांतीदेवता सावित्रीबाई फुले यांची एकत्रित प्रतिमा ,सन्मान पत्र, शाल ,व श्रीपळ देऊन सन्मानित करण्यात आले तर वेळोवेळी पोलीस यंत्रणा त्यांच्या सूचना पोलीस पाटील सौ.भारती व त्यांचे पती दीपक भोसले तसेच गाव परिसरात फिरून प्रबोधन करून सूचना देऊन लोकजागृती करत असलेले व  गावच्या प्रत्येक कामात हिरीरीने मदतीला येणारे फोटोग्राफर तुळशीराम यादव आणि ग्रामपंचायत कर्मचारी सदाशिव भोसले,विलास अवघडे,ज्ञानेश्वर गुळीक, सुनंदा अवघडे,कुमारी बिलकेश ताहिर हुशेन शेख व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्यात कोरोना विषयक जागृती व्हावी यासाठी पत्रके,ऑनलाईन मीटिंग च्या माध्यमातून प्रबोधन केलेबद्दल  मुख्याध्यापक हणमंतराव अवघडे यांचा देखील कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र शाल,श्रीपळ देऊन सन्मान केला.तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थांनचे वतीने गावच्या प्रत्येक कार्यक्रमात पुण्यातुन येऊन सहकार्य व  मार्गदर्शन आणि शाबासकीची थाप देतात म्हणून *माणसाळलेला माणूस*  रघुनाथ ढोक यांचा देखील सरपंच वाघ यांनी  सन्मान केला.

यावेळी सरपंच वाघ ,डॉ.येवले, ढोक यांनी मौलिक विचार मांडून या पूर्वी सर्व महापुरुषांचे महामारीत केलेल्या योगदानाची व आता कशी काळजी घ्यावयाची व भविष्यात चुकून कोव्हिड ची दुसरी लाट आली तर आतापासूनच आपले गाव परिसर जागरूक ठेवून मास्क ,सार्वजनिक ठिकाणी वावरताना योग्य ती दक्षता व इतर सरकारी सूचनाचे पालन काटेकोर पणे करावे असे मार्गदर्शन करून आपण  न घाबरता रॅट-रॅपिड टेस्ट करून घ्या आणि मी व माझे कुटुंब सुरक्षित राहील याची योग्य ती काळजी घ्या असे म्हंटले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन .हणमंतराव अवघडे सर तर आभारप्रदर्शन तुळशीराम यादव यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन व वावरहिरे ग्रामपंचायत, यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News