शासनाचे नियम पाळून नवरात्र उत्सव शांततेत साजरे,शिवाई देवी मंडळाने नऊ रंगाच्या कोरोना नियमांचा दिला संदेश


शासनाचे नियम पाळून नवरात्र उत्सव शांततेत साजरे,शिवाई देवी मंडळाने नऊ रंगाच्या कोरोना नियमांचा दिला संदेश

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

दौंड  -- दौंड शहरासह परिसरातील सर्वच नवरात्र उत्सव मंडळांनी शासनाचे सर्व नियमांचे पालन करून नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने आणि शांततेत पार पाडले आहेत,रामवाडी येथील तुळजा भवानी मंदिरात शोषल डिस्टनशिंग चे पालन करून देवीची मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा न करता मंदिर प्रदक्षिणा करून मोलाचा संदेश दिला आहे, तर शिवराज नगर येथील शिवाई देवी नवरात्र उत्सव मंडळाने होमहवन साध्या पद्धतीने करून नवरात्रीच्या नऊ रंगाचे कोरोना विषयी काळजी घ्यायला लावणारे नऊ मोलाचे संदेश लोकांचे लक्ष वेधून घेत होते,पहिला रंग 1) पहिला रंग करडा लिहावा,सण सर्व सुरक्षित व्हावा,2)दुसऱ्यास केशरी भगवा,कापडी मास्क लावा,3)तिसरा दिन शुभ्र असावा,तळहात स्वच्छ ठेवा,4)चौथ्यास तांबडा मिरवा,थुंकीवर ताबा ठेवा,5)पाचवा निळा झळकावा, गर्दीत सुरक्षित अंतर ठेवा,6)पिवळा राहील सहावा, स्वतःवर विश्वास ठेवा,7)सातवा गारवा हिरवा,संतुलित आहार घ्यावा,8)आठवा जांभळा व्हावा,झोपण्याची वेळ ठरवा,9)लेवून गुलाबी नववा,कोरोनाला ठरवून पळवा असे कोरोना काळात संदेश देण्यात आला होता,अशाप्रकारे शासनाने दिलेले सर्व नियम पाळून दौंड तालुक्यात नवरात्र उत्सव साजरे करण्यात आले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News