दौंड पोलीस ठाण्यात आज भावनिक वातावरण,चार महिला कर्मचाऱ्यांसह 13 जणांच्या बदल्या


दौंड पोलीस ठाण्यात आज भावनिक वातावरण,चार महिला कर्मचाऱ्यांसह 13 जणांच्या बदल्या

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

दौंड --पोलिसांना आतापर्यंत कडक आवाजात बोलतानाच ऐकले आहे पण दौंड पोलीस स्टेशन आवारात आज एकदमच भावनिक वातावरण पहायला मिळाले, निमित्त ही तसेच होते पहिल्यांदाच एकसाथ 13 जणांच्या बदल्या झालेल्या आहेत, त्यामध्ये चार महिला पोलीस कर्मचारी होत्या,या सर्वांचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,यामध्ये त्यांचे नाव आणि मिळालेले पोलीस स्टेशन 1)स पो फौजदार गोरख कसपटे (वालचंदनगर),2)पो हवा पंडित मांजरे(शिक्रापूर),3)पो नाईक सचिन बोराडे(इंदापूर),4)राकेश फाळके (इंदापूर),5)कचरू शिंदे इंदापूर,6)कल्याण शिंगाडे (बारामती वाहतूक शाखा),7)संजय देवकाते (भिगवण),8)रमेश काळे (यवत),9)सूरज गुंजाळ (इंदापूर),महिला पोलीस 1)दिपाली खेत्रे (भिगवण), 2)सविता भवार (रांजणगाव),3)शितल रौधळ (रांजणगाव),4)मोनिका खरात (बारामती शहर) अशा सर्वांच्या पुढील पोलीस स्टेशन येथे बदली झालेली आहे, गेल्या चार पाच वर्षांपासून हे सर्वजण दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत कर्तव्य बजावत होते,त्यामुळेच एकमेकांना सोडून जाताना भावनिक वातावरण तयार झाले होते, पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी या सर्वांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी बोलताना सुनिल महाडिक म्हणाले काम करत असताना थोडीफार अनबन होतच असते परंतू तो एक कामाचा भाग आहे त्याचे मनावर घ्यायचे नाही,आणि सर्वानी हसत हसत पुढील मिळालेल्या पोलीस स्टेशनला हजर व्हायचे आहे, या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन रवाना करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News