कोपरगाव बाजारपेठेला उर्जितावस्था प्राप्त व्हावी- जनार्दन कदम


कोपरगाव बाजारपेठेला उर्जितावस्था प्राप्त व्हावी- जनार्दन कदम

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव- गेल्या मार्च २०२० पासून  देशभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराची सुरुवात झालेली होती. त्या दरम्यान संपूर्ण कोपरगाव तालुक्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. या  लॉकडाऊन काळात शहरातील व तालुक्यातील संपूर्ण उद्योगधंदे बाजारपेठ व छोटे मोठे व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम दिसून आलेला होता. 

कोपरगाव शहरातील व ग्रामीण भागातील व्यवसायाच्या दृष्टीने आर्थिक परिस्थितीमध्ये  बदल झाले. त्यामुळे कोपरगाव शहरातील बाजारपेठ ठप्प झाली. लोकांचा व्यवसाय बंद असल्याने छोटे व्यावसायिक फळे, भाजी विक्रेते तसेच हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची जगण्यासाठी धडपड सुरु होती. या परिस्थितीत अनेक मजूर व हातावर पोट भरणारे कुटुंब यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते. या दरम्यान कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन, लायन्स क्लब  व इतर सामाजिक संस्था यांनी लॉकडाऊन काळात सुमारे दोन महिने गरीब व गरजू लोकांना मोफत घरपोच जेवण व किराणा सामान पुरविण्याचे काम केले. 

कोरोनाचे या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील व तालुक्यातील बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. तिला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांनी छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या आपल्या बाजारपेठेतील व्यापार्यांकडून येणाऱ्या सर्वात मोठा सण असलेल्या दीपावली सणाची आवश्यक वस्तूंची खरेदी करावी व आपल्या शहरात कोरोना काळात सामाजिक दायित्व निभावणाऱ्या शहरातील व तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांकडून करून कोरोना काळात मोडकळीस आलेल्या बाजारपेठेतच पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्यवहार करून बाजारपेठ भक्कम बनवण्याचे आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती व नगरसेवक श्री.जनार्दन कदम यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News