राष्ट्रवादीच्या निवेदनाची घेतली दखल, कोपरगावात कर्मवीर नगरमध्ये विकास कामांना प्रारंभ


राष्ट्रवादीच्या निवेदनाची घेतली दखल, कोपरगावात कर्मवीर नगरमध्ये विकास कामांना प्रारंभ

राष्ट्रवादीच्या निवेदनाची दखल घेवून कर्मवीर नगर परिसरात सुरु झालेली विकास कामे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

                कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर, दुल्हनबाई वस्ती व आदिनाथ सोसायटी चे परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण,पथदिवे बसवावे व भूमिगत गटारी करून द्याव्या अशा आशयाचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आले होते.

                       कर्मवीरनगर, दुल्हनबाई वस्ती व आदिनाथ सोसायटी परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून पडलेली मोठ मोठी खड्डे अपघाताला निमंत्रण देत होती. त्यामुळे या परिसरात  रस्त्याचे अस्तित्व शिल्लक राहिले नव्हते त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असून नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. परिसरात भूमिगत गटारी नसल्यामुळे सांडपाणी वाहून जात नाही. पथदिव्यांची व्यवस्था नाही अशा अनेक प्रश्नांकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनाच्या माध्यामतून लक्ष वेधून आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता. त्याची कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेवून या परिसरात रस्त्यांच्या कामाला नुकतीच सुरुवात केली आहे त्याबद्ल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून कोपरगाव नगरपरिषदेणे तातडीने दखल घेवून विकास कामांना सुरुवात केल्याबद्दल कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष सुनीलभाऊ गंगुले, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस संदीप कपिले, सतीष भालेराव, जुनेद शेख  समीर पठाण, रिजवान शेख, प्रशांत औताडे,जावेद पठाण, पप्पु सैय्यद आदींसह राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहे.


         

जाहिरात
Search
विडिओ
Recent News