डॉ.टी.के. पुरनाळे यांचे अकाली निधन


डॉ.टी.के. पुरनाळे यांचे अकाली निधन

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण: काँग्रेस आयचे ज्येष्ठ नेते शेवगाव प.स.माजी सभापती डॉ.टी.के.पुरनाळे बाबा यांचे गुरवार दि २९ रोजी रात्री १० वा. वृद्धापकाळाने शेवगाव येथे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय वर्ष ८५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी गं.भा.मंदाकिनी पुरनाळे, त्यांची कन्या सौ. हर्षदाताई काकडे जावई अॅड. विद्याधर काकडे, तीन नाती सौ.कल्याणी कोकाटे, सौ.डॉ.सायली निकम, कु.भाग्यश्री काकडे व नातू पृथ्वीसिंग काकडे असा परिवार आहे.  अंत्यविधी वेळी त्यांच्या मृतदेहास त्यांच्या कन्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी अग्नी दिला. यावेळी मा.आ.संभाजीराव फाटके, आमदार मोनिकाताई राजळे, मा.आ.चंद्रशेखर घुले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, मा.जि.प.सदस्या विजयाताई अंबाडे, काकासाहेब नरवडे, दिलीपराव लांडे, अरुण लांडे, गणेश रांधवणे, शिवशंकर राजळे, संजय नांगरे, जगन्नाथ गावडे, संजय आंधळे, बापूसाहेब भोसले, अॅड.अविनाश मगरे, अंबादास कळमकर, दत्तात्रय फुंदे, बंडूभाऊ रासने, सुरेशनाना चौधरी, रघुनाथ सातपुते, शशिकांत कुलकर्णी, अनंत कुलकर्णी, डोंगरे संजय, राम महाराज झिंजुर्के, ज्ञानेश्वर महाराज बटूळे, अॅड.विजयराव काकडे, सुभाष काकडे, संजय शिंदे, दिनकर गर्जे, अॅड.निळकंठ बटूळे, गुलाबराव दसपुते, शरद सोनवणे, राजू पुंडेकर, बापूसाहेब पाटेकर, आसाराम शेळके, सिराज भाई शेख, पंडितराव नेमाने, अशोक पातकळ, किशोर दहिफळे, नवनाथ खेडकर, अशोक ढाकणे, शेषराव वंजारी, शिवाजी कणसे आदि उपस्थित होते. 

कै.डॉ.पूरनाळे हे १९६७ ते १९९७ पर्यंत 30 वर्षे जि.प. सदस्य होते. तर दोन वेळेस पंचायत समिती शेवगावचे सभापती पद त्यांनी भूषविले होते. त्यांनी आपले वैद्यकीय व्यवसायातून शेवगाव तालुक्यातील गोरगरिबांची सेवा केली. शेवगाव तालुक्यातील गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून जनता त्यांच्याकडे पाहत होती. गरिबांच्या कामासाठी ते स्वतः तत्परतेने त्यांच्याबरोबर जाऊन काम करून देत असत. डॉ.पूरनाळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. साधी राहणीमान व उच्च विचारसरणी असणारे हे व्यक्तिमत्व होते. निस्वार्थी, शांत स्वभावाचे व दूरदृष्टी असणारे एक महानपुरूष ते होते. सभापती असताना त्यांनी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तलाव बांधण्याची बरीचशी कामे केली. एकंदरीत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी रस्ते आणि पाणी या दोन बाबी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या प्रश्नावर मात करण्यासाठी डॉक्टरांनी खूप परिश्रम घेतले. शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी तालुक्यात पहिली साने गुरुजी दूध डेअरी स्थापन करून दूध संकलन केंद्र सुरू केले. शेतकऱ्यांना शेतीला दुधाचा जोडधंदा उभा करून दिला. तसेच तालुक्यात शासनाकडे पाठपुरावा करून आय.टी.आय. मंजूर करून घेतले. शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी कोपरे धरण व्हावे यासाठी त्यांनी अनेक वेळेस लढा दिला. डॉ.पूरनाळे हे स्वाभिमानी वृत्तीचे होते. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी कधीही जनतेची फसवणूक केली नाही. राजकीय जीवनामध्ये त्यांना आपल्या परखड स्वाभिमानी आणि गंभीर स्वभावामुळे अनेक राजकीय पुढाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी नाना प्रकारचे संघर्ष करावे लागले. १९७२ च्या दुष्काळावेळी डॉ. सभापती होते. हा दुष्काळ अतिशय भयानक होता. या दुष्काळात लोकांच्या हाताला काम नव्हते. खायला अन्न नव्हते. अशा बिकट परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी आपल्या प्रशासकीय कर्मचारी, कार्यकर्त्यांना व सर्वसामान्य लोकांना एकत्र जमून नियोजनपूर्वक या दुष्काळी संकटाला तोंड दिले. अशा महान नेत्याला तालुका आज मुकला आहे. यावेळी त्यांच्या पावन स्मृतीस अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील अनेकांनी भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News