एसटी बसच्या धक्क्याने इंदापूरातील दुचाकीस्वार तरुण मृत्यूमुखी व एक जण जखमी -


एसटी बसच्या धक्क्याने इंदापूरातील दुचाकीस्वार तरुण मृत्यूमुखी व एक जण जखमी -

श्री . काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी ( दि. ३१ ऑक्टोंबर ) :पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे पाटीजवळ आज (दि.३०) बसचा दुचाकीस धक्का बसून इंदापूरच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला.गौरव रमेश महामुनी (वय २० वर्षे,मेनरोड, इंदापूर) असे अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर सागर बाबर (वय १९ वर्षे कसबा,इंदापूर) असे त्याच्या जखमी सहका-याचे नाव आहे. गौरव हा औषध आणण्यासाठी आपल्या दुचाकीवरुन (एमएच ४२ए वाय ४९८७) पळसदेवला निघाला होता. वरकुटे पाटीजवळ आल्यानंतर सोलापूरकडून पुण्याला जात असणा-या स्वारगेट डेपोच्या एसटी बसचा दुचाकीस कट  लागला  त्यामध्ये झालेल्या अपघातात गौरव गंभीर जखमी झाला. अपघातानंतर एसटी बस चालकाने एसटी थांबवता तशीच पुढे नेली, असे तिथे  असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गौरव यास इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात  उपचारासाठी  दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.  गौरव याच्या मृत्यूने इंदापूर शहरात व त्याच्या  मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातातील दुसऱ्या जखमीवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News