संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
चांदेकसारे गावातील जागृत दैवत असणारे ख्वाजा पीर बाबा दर्गा ही तब्बल १०० वर्ष जुनी असुन हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतिक मानले जाते.असे गावातील जुनी जाणकार वयस्कर ग्रामस्थ मंडळी सांगतात.कारण ख्वाजा पीर बाबा यांच्या उरूसा मध्ये सर्व समाजातील लोक स्वत: भाग घेतात.सना- सुदीला हिंदू भावीक दर्गा वर येऊन नैवेद्य दाखवतात व मनोभावे पुजा करतात.
गेल्या काही काळात दर्गा कडे दुर्लक्ष झाले होते परंतु गावातील तरुण व जेष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन दर्गा ची पुन:भरण करणाचे ठरवले. या कार्यात कुठलाही अडथळा आला नाही. लोक वर्गणी मधुन तसेच गावातील दानशूर व्यक्ती कडून वेळोवेळी मदत मिळाली. त्यामुळे दर्गा चे कंपाऊंड तयार करण्यात आले. तसेच ऊरूस कमिटी ने अवांतर खर्च कमी करुन तो पैसा दर्गा ची डागडुजी करण्यासाठी उपयोगात आणला. त्यात दर्गा जवळ ब्लॉक बसवने,दर्गा परीसरात वृक्षरोपण करणे,लाईट बसविने,अशा विविध प्रकारचे कामे या माध्यमातून करण्यात आली.आज ईद ए मिलाद च्या पवित्र दिनाचे आैचित्य साधून मुख्य दर्गा चे नुतनीकरण करण्यात आले.व त्यास आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आली.या वेळी जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल चे सचिव श्री सुनिल भास्करराव होन यांच्या हस्ते नारळ अर्पण करण्यात आले.या प्रसंगी गावातील जेष्ठ ग्रामस्थ व रासप चे अल्पसंख्यक सेल चे प्रदेशाध्यक्ष श्री सैय्यदनूर बाबा शेख, सत्तार भाई शेख,अॅड वसिम इनामदार,फारूक भाई शेख,फजलू भाई शेख,गणीभाई, व सागर होन इ उपस्थित होते.
या प्रसंगी सय्यद बाबा शेख यांनी पुढील कामाची रूपरेषा समजावून सांगितली व ४हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी चे काम लवकरच पुर्ण होईल व भाविकांचे पिण्याचे पाण्याचे हाल होणार नाही याची खात्री दिली, तसेच दर्गा परीसरात अजूनही खुप सुविधा उपलब्ध करून देणे आहे अशी इच्छा ही या वेळी सय्यद बाबा यांनी व्यक्त केली या कार्यक्रमा प्रसंगी फारूख भाई शेख यांनी आभार मानले