कर्मवीर नगर परिसरातील रस्त्याच्या कामाला सुरुवात !!


कर्मवीर नगर परिसरातील रस्त्याच्या कामाला सुरुवात !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांच्या पाठपुराव्याला यश !!

जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीतील कर्मवीरनगर,आदिनाथ सोसायटी, सह्याद्री कॉलनी आणि दुल्हनबाई वस्ती हा परिसर नुकताच हद्दवाढ होऊन कोपरगाव नगरपरिषदेला जोडला गेला आणि त्यानंतर दोन वर्षांपासून कर्मवीरनगर येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी येथे असलेल्या नागरी समस्यांकडे वेळोवेळी नागरपरिषदेचे लक्ष वेधले होते. रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट,आरोग्य अशा वेगवेगळ्या विषयावरती ते पाठपुरावा करीत होते,अखेर त्यांच्या या प्रयत्नांना आणि सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून नगरपरिषदेने कर्मवीरनगर आणि सह्याद्री कॉलनी येथील रस्त्याचे काम सुरू केले आहे.

         यावेळी सामाजिक कार्यकर्ते निसार शेख बोलताना म्हणाले की,कर्मवीरनगराचा परिसर ग्रामीण भागात असल्याने मोठ्या प्रमाणात असुविधा याठिकाणी होत्या,कच्चे रस्ते असल्याने पावसाळ्यात पाणी जमा होऊन चिखल होऊन रस्त्यावरून चालनेही कठीण झाले होते.अनेक दुचाकीस्वार चिखलात पडत होते,संपूर्ण परिसरात गटारी नाही स्ट्रीट लाईट नाही त्यामुळे नागरिकांना मोठी असुविधा होत आहे,त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मी आणि माझे  सहकाऱ्यांनी वेळोवेळी पालिकेकडे पाठपुरावा केल्याने आज या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालीआहे.तसेच माझ्या भागातील सर्वच नागरिकांनी मला सहकार्य केले आहे म्हणून मी वेळोवेळी पाठपुरावा करू शकलो आणि आज प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी शेख यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला उत्कृष्ट दर्जाचे काम करून दर्जेदार रस्ते करावे अशी विनंती केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News