मोहंमद पैगंबर यांनी जगाला शांती व समतेचा संदेश दिला -पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे


मोहंमद पैगंबर यांनी जगाला शांती व समतेचा संदेश दिला -पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे

रक्तदानाने पैगंबर जयंती साजरी..महिलांचा देखील रक्तदान शिबीरात सहभाग

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत)

मोहंमद पैगंबर यांनी जगाला शांती व समतेचा संदेश दिला. सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने रक्तदान होणे गरजेचे आहे. रक्ताची गरज सर्वांना पडते. रक्ताला जात, धर्म नसते. कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी घेण्यात आलेले रक्तदान शिबीराचे उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना जिल्हा पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांनी व्यक्त केली. तर मोहंमद पैगंबर यांनी अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी सांगितलेल्या विचारांवर चालण्याची खरी गरज असून, सामाजिक ऋण फेडण्यासाठी युवकांनी रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.  

मोहंमद पैगंबर जयंती निमित्त मिरा बिल्डर्सच्या वतीने रहेमत सुलतान सभागृह येथे कोरोनाच्या संकटकाळातील रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक ढुमे बोलत होते. यावेळी कोतवालीचे पो.नि. प्रविण लोखंडे, तोफखाना पोलीस स्टेशनचे पो.नि. हारुन मुलानी, मराठी पत्रकार परिषदेने नाशिक विभागीय अध्यक्ष मन्सूर शेख, मिरा बिल्डर्स संचालक इरफान जहागिरदार, समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अजीम राजे, खादिम ए दर्गाह मिरावली राजूभाई जहागीरदार, कर्मयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शफी जहागीरदार, मोसिन सय्यद, शाहनवाज तंबोळी, शाह फैसल शानु, मुबीन शेख, यूनुस तांबटकर, कासम केबलवाले, अन्वर सय्यद, जुनेद जहागीरदार, रासकीन जहागीरदार, वहाब सय्यद आदींसह पोलिस प्रशासन, डॉक्टर उपस्थित होते.प्रास्ताविकात इरफान जहागिरदार यांनी मोहंमद पैगंबर जयंती निमित्त राबविण्यात येणार्‍या विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. मोहंमद पैगंबर जयंती निमित्त झालेल्या या रक्तदान शिबीरात युवकांसह महिलांनी देखील स्वयंफुर्तीने सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदात्यांचा अहमदनगर ब्लड बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनवर सय्यद यांनी केले. आभार आजीम राजे यांनी मानले.मोहंमद पैगंबर जयंती निमित्त मिरा बिल्डर्सच्या वतीने रहेमत सुलतान सभागृह येथे कोरोनाच्या संकटकाळातील रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे, कोतवालीचे पो.नि. प्रविण लोखंडे, तोफखाना पोलीस स्टेशनचे पो.नि. हारुन मुलानी, मराठी पत्रकार परिषदेने नाशिक विभागीय अध्यक्ष मन्सूर शेख, मिरा बिल्डर्स संचालक इरफान जहागिरदार, समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अजीम राजे, खादिम ए दर्गाह मिरावली राजूभाई जहागीरदार, कर्मयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शफी जहागीरदार, मोसिन सय्यद, शाहनवाज तंबोळी, शाह फैसल शानु, मुबीन शेख, यूनुस तांबटकर, कासम केबलवाले, अन्वर सय्यद, जुनेद जहागीरदार, रासकीन जहागीरदार, वहाब सय्यद आदी. (छाया-साजिद शेख-नगर)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News