ईद ए मिलाद निमित्त कोपरगावात रक्तदान शिबिराचे आयोजन !!नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


ईद ए मिलाद निमित्त कोपरगावात रक्तदान शिबिराचे आयोजन !!नागरीकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव शहरासह परिसरात ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.दरवर्षी मोठा गाजावाजा करत जुलूस काढून विविध सामाजिक उपक्रम राबवून पैगंबर जयंती साजरी केली जाते मात्र यंदा कोरोनाचा संकट असल्याने मुस्लिम बांधवांकडून अत्यंत साध्या पद्धतीने सध्याची गरज ओळखून रक्तदान करून पैगंबर जयंती साजरी करण्यात आली आहे.शहरातील संजीवनी ब्लड बँक येथे मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी 50 पेक्षा अधिक तरुणांनी रक्तदान केले.याप्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,मौलाना अब्दुल हमीद राही, नगरसेवक हाजी महेमूद सय्यद, रियाज सर,  नगरसेवक मंदार पहाडे आदि उपस्थित होते.  

             यावेळी बोलताना मुस्लिम विकास कमेटीचे संस्थापक हाजी महेमूद सय्यद म्हणाले  दरवर्षीप्रमाणे या हि वर्षी मिरवणुक न काढता सर्व युवकांना विश्वासात घेऊन समाज उपयोगी कार्यक्रम राबण्याची संकल्पना मांडली. कोरोनाची सद्य स्थिती पाहता बहुतेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे रक्त वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे.अशा परिस्थितीत आपण केलेल्या रक्तदानाने कुणाचा जीव वाचवण्यास मदत होईल या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  हीच शिकवण मोहम्मद पैगंबर यांनी पूर्ण जगाला दिली आहे असंही सय्यद यांनी म्हटलं आहे .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरकार ग्रुपचे मोसीन सय्यद, अरबाज सय्यद, पप्पू सय्यद, राजू सय्यद,वसीम शेख, रईस शेख आदी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News