गेल्या दोन दिवसांपासून इंदापूर बसस्थानक आवारात फिरत असलेल्या अनोळखी १४ वर्षीय मुलाची इंदापूर पोलीस व पत्रकारांच्या तत्परतेने झाली नातेवाईकांशी भेट.


गेल्या दोन दिवसांपासून इंदापूर बसस्थानक आवारात फिरत असलेल्या अनोळखी १४ वर्षीय मुलाची इंदापूर पोलीस व पत्रकारांच्या तत्परतेने झाली नातेवाईकांशी भेट.

काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर -याबाबत सविस्तर हकीकत अशी की,  इंदापूर बस स्थानक परिसरात आज दि. ३० रोजी आधार न्यूजचे पत्रकार जितेंद्र जाधव यांना सदर मुलगा संशयीतरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी याबाबत त्या मुलाशी  बोलले असता मुलगा गावाकडची वाट चुकल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने याचे गांभीर्य ओळखून त्या मुलाला इंदापूर पोलिस ठाण्यात आणले. इंदापूर पोलीस ठाण्याचे  कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचारी यांनी संबंधित मुलाशी चर्चा केल्यानंतर हा जळगाव जिल्हातील यावल या तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले.सदर पोलिस ठाण्याने या बेपत्ता झालेल्या मुलाविषयी तपास यंत्रणा कामास लावून शेजारील तालुक्यातील पोलिस ठाण्याशीही संपर्क साधला. माळशिरस (जि. सोलापूर ) येथील पोलीस ठाण्याकडून या मुलाच्या बाबत सकारात्मक माहिती मिळाल्याने त्याठिकाणी त्या मुलाच्या नातेवाईकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन, वर्णनावरुन मोटेवाडी ता. माळशिरस याठिकाणी असलेल्या ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊसतोड कामगाराचा मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे इंदापूर पोलिस ठाण्याने इंदापूर याठिकाणी मुलगा सापडल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली.काही कालावधीनंतर मुलाचे चुलते या मुलाला नेण्याकरिता आले. 

या मुलाची व नातेवाईकाची भेट घडविण्यात इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर,आधार न्युज चे प्रतिनिधी जितेंद्र जाधव,हवालदार अरुण रासकर,पोलीस काॅन्सटेबल विजय झारगड,पोलीस काॅन्सटेबल गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले.

सदर मुलगा हा इंदापूर बसस्थानकामध्ये दोन दिवस उपाशी व घाबरलेला होता त्याच्या पत्रकार जितेंद्र जाधव यांची नजर गेली व त्यांनी त्या मुलास बोलते केले व पोट भर जेवन दिले .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News