कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र वाटप संपन्न !!


कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र वाटप संपन्न !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

-सामाजिक न्याय अधिकारीता भारत सरकार मंत्रालय अंतर्गत अहमदनगर जिल्हा समाज कल्याण कार्यालय व लायन्स मुख बधिर व अपंग विद्यालय कोपरगाव आयोजित दिव्यांगाना वैश्विक ओळखपत्र वाटप दि २९ ऑक्टोबर २०२० रोजी विद्यालयामध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांच्या आधारे  सामाजिक अंतर मास्क सॅनिटायझर चा योग्य वापर करत तालुक्यातील १३५ दिव्यांगाना शाळेचे विश्वस्त सुजित रोहमारे यांच्या शुभ हस्ते ओळखपत्र वाटप करण्यात आले.

  या पकार्यक्रमासाठी  विद्यालयाचे अध्यक्ष अशोक रोहमारे  जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, सहाय्यक सल्लागार दिनकर साठे स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर डागा प्रसाद साबळे  यांचे विशेष सहकार्य लाभले.

 या प्रसंगी नारायण डुकरे यांनी दिव्यांग बांधवांना ओळखपत्राचे महत्व उपयोग फायदे या विषयी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुजित रोहमरे यांनी बोलतांना सांगितले की हे ओळखपत्र अतिशय उपयुक्त असून याचा वापर संपूर्ण भारतामध्ये आपण करू शकतात या माध्यमातून आपण शासनाच्या विविध योजनेचा लाभ देखील मिळवू शकतात.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुका अध्यक्ष मुकुंद मामा काळे,परमेश्वर कराळे,जंगु मारससाळे,योगेश गंगावल शरद खिल्लारी, प्रविण भुजाडे, बाळासाहेब लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक रमेश टिक्कल मच्छिन्द्र पाचोरे अनिल गवळी विजय घारे यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापक भास्कर गुरसळ यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  नारायण डुकरे यांनी केले परमेश्वर कराळे,जंगु मारससाळे,योगेश गंगावल शरद खिल्लारी,प्रविण भुजाडे, बाळासाहेब लांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक रमेश टिक्कल मच्छिन्द्र पाचोरे अनिल गवळी विजय घारे यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापक भास्कर गुरसळ यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  नारायण डुकरे यांनी केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News