नगरपरिषदेने घरपटटी,पाणीपटटी तसेच शॉपींग सेटरमधील गाळयांचे भाडे माफ करावे !!-कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टीची मागणी.


नगरपरिषदेने घरपटटी,पाणीपटटी तसेच शॉपींग सेटरमधील गाळयांचे भाडे माफ करावे !!-कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टीची मागणी.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरीकांची पाणीपटटी,घरपटटी तसेच शॉपींग सेंटरमधील गाळयांचे भाडे माफ करण्याची मागणी शहराध्यक्ष दत्ता काले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने कोपरगाव नगरपरीषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे केली आहे.

सध्या जगावर तसेच देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून देशभर लाॅकडाउन होते,त्यामुळे मोठया प्रमाणात आर्थीक व्यवहार ठप्प झालेले आहे. रोजगार,उदयोगधंदे बंद असल्याने छोटे व्यावसायिक, फळे,भाजी विक्रेते तसेच हातावर पोट भरणा-या नागरीकांची जगण्यासाठीची धडपड सुरू आहे.रोजच्या उदरनिर्वाहाची चिंता भेडसावत आहे.

जीवन मरणाशी संघर्ष करावा लागत असलेल्या या परिस्थितीत अनेक कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली.ही वस्तुस्थिती असतांना नगरपालिकेकडून आकारण्यात येणारी घरपटटी आणि पाणीपटटी तसेच व्यवसाय नसल्यामुळे शॉपींग सेंटरमधील गाळयांचे भाडे भरण्याची आर्थीक परिस्थिती नागरीकांची नसल्यामुळे यापुर्वीही माहे एप्रिल व मे मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपालिकेला वारंवार विनंती केलेली आहे. आज पुन्हा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना भेटून शहरातील नागरीकांची घरपटटी व पाणीपटटी आणि शॉपींग सेंटरमधील गाळे धारकांचे भाडे माफ करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांना निवेदन दिले,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News