झगडे फाटा ते पुणतांबा फाटा रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा धडक मोर्चा ...!! चांदेकसारे ग्रामपंचायतीचा आठ दिवसाचा अल्टीमेटम !!


झगडे फाटा ते पुणतांबा फाटा रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा धडक मोर्चा ...!! चांदेकसारे ग्रामपंचायतीचा आठ दिवसाचा अल्टीमेटम !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव - राष्ट्रीय महामार्ग १६o Bवरील झगडेफाटा ते पुणतांबा फाटा या दरम्यान पडलेले खड्डे तातडीने आठ दिवसाच्या आत . बुजवावे अन्यथा दि. ५ / ११ / २०२० रोजी झगडेफाटा चौफुलीवर मोठ्या प्रमाणात रास्ता रोको व सबंधीत खात्याच्या ऑफीस वर तसेच अधिकाऱ्याच्या घरावर चांदेकसारे पंचक्रोशीतील झगडेफाटा,घारी,डाऊच खु॥डाऊच बु॥,जेऊर कुंभारी, येथील ग्रामस्थ धडक मोर्चा नेणार असल्याचे निवेदन चांदेकसारे ग्रामपंचायतच्या वतीने मा.तहसिलदार साहेब कोपरगाव, मा.पोलिस निरीक्षक साहेब कोपरगाव पोलीस ठाणे, मा. सहाय्यक अभियंता राष्ट्रीय महामार्ग १६oB उप विभाग संगनेर.मा. सहाय्यक अभियंता साहेब ( सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगाव ) यांना देण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग -१६ oB वरील झगडेफाटा ते पुणतांबा फाटा दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले असुन वहातुकिस अडथळा निर्माण होत असुन दिवसेंन दिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे व कित्येक अपघातग्रस्तांना गंभीर दुखापत तसेच अवयवांची मोडतोड झालेली आहे.तरी संबंधीत खात्याने या रस्त्यावरील खड्डे आठ दिवसात बुजवावे अन्यथा दि ५ / ११/२०२० रोजी झगडेफाटा चौफुलीवर चांदेकसारे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया प्रमाणात रस्तारोको आंदोलन करणार असुन त्या नंतर संबंधीत खात्याच्या ऑफिसवर तसेच अधिकाऱ्यांच्या घरावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे तसेच यानंतर होणाऱ्या परीणामास आपणच सर्वस्वी जबाबदा रहाल असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News