कोल्हार कोल्हुबाई पाझर तलाव दुरुस्तीच्या ईस्टीमेंटचे काम अंतिम टप्प्यात


कोल्हार कोल्हुबाई पाझर तलाव दुरुस्तीच्या ईस्टीमेंटचे काम अंतिम टप्प्यात

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व कोल्हार ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश...मुख्यमंत्री व जलसंधारण मंत्रींनी घेतली दखल

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - कोल्हार कोल्हुबाई (ता. पाथर्डी) येथील शेतकर्‍यांसाठी जिवनदाई असलेला पाझर तलावास मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व कोल्हार ग्रामस्थांच्या वतीने जि.प. पांटबंधारे विभाग व प्रशासकीय स्तरावर मागील एक वर्षापासून करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने तलाव दुरुस्तीसाठी ईस्टीमेंट काढण्याचे काम हाती घेण्यात आले असून, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून हे काम सुरु झाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहे. 

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व कोल्हार ग्रामस्थांच्या वतीने सदर तलावच्या गळती संदर्भात 11 नोव्हेंबर 2019 ला जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन कळविण्यात आले होते. याची दखल न घेतल्यामुळे 30 नोव्हेंबर 2019 ला विभागीय आयुक्त नाशिक यांना पत्राद्वारे कळविण्यात आले होते. विभागिय आयुक्त यांनी 2019 जिल्हा प्रशासनास कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तरी देखील पाटबंधारे विभागने याबाबत कारवाई केली नाही. दि.20 फेब्रुवारी 2020 मध्ये जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना तलावाची गळती थांबविण्यासाठी उपाय योजना करण्याचे निवेदन देण्यात आले. त्यांनी कारवाईचे आदेश देऊन देखील अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले. यानंतर सदर प्रकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कळविण्यात आले. या तलावाची गळती थांबण्यासाठी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दखल घेऊन या कामाचे ईस्टीमेट काढून निधी उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. 

जि.प. पाटबंधारे पाथर्डी विभागाचे अभियंता देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोल्हार कोल्हुबाई येथील पाझर तलावाच्या गळती संदर्भात काम करण्यासाठी इंजी. भणगे यांच्याकडे ईस्टीमेट काढण्याचे काम सुरु आहे. यावर्षी जास्त पाऊस झाल्याने पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरले असल्याने आतल्या बाजुची लेव्हल घेण्याचे काम कठिण होते. ईस्टीमेट संपुर्ण कामाचा गाभा असून, योग्य सदोष पध्दतीने निरीक्षणाद्वारे ईस्टीमेट तयार करण्यासाठी बराच पाठपुरावा करण्यात आला आहे. आठ ते दहा दिवसात ईस्टीमेट तयार होऊन ते शासनास सादर केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तलावाची दुरुस्ती होण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, गावाचे सरपंच शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, अ‍ॅड. संदिप जावळे, बाबाजी पालवे, शंकर डमाळे, सतिष पालवे, रमेश पालवे, अनिल पालवे, ऋषिकेश पालवे, उद्धव गिते, महादेव पालवे, भाऊराव गिते, बाबाजी घुले, केशव पालवे, अरूण पालवे, राहुल पालवे, किशोर पालवे, मदन पालवे, किशोर पालवे, आजिनाथ आव्हाड, गौरव गर्जे, अ‍ॅड. पोपट पालवे, भाऊसाहेब कर्पे, जगन्नाथ जावळे, निवृती भाबड, संतोष मगर, दिगंबर शेळके, संभाजी वांढेकर प्रयत्नशील आहेत. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News