जिल्ह्यातील फरार आरोपी पकडण्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे आदेशाला यश,7 महिन्यापासून फरार आरोपी LCB च्या जाळ्यात


जिल्ह्यातील फरार आरोपी पकडण्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे आदेशाला यश,7 महिन्यापासून फरार आरोपी LCB च्या जाळ्यात

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

 बारामती  -- पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व फरार आरोपीना पकडण्याचे आदेश जारी केले आहेत, त्यानुसार पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे,दि २९/१०/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माननिय पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पाहिजे फरारी आरोपी चा शोध घेत असताना वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी वरून मौजे काटी ता इंदापूर जि पुणे येथे जाऊन तेथील चौकात सापळा रचून एक संशयित इसम ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव *मदन अरुण काळे वय २९वर्षे रा जगताप मळा  शेटफळ हवेली ता इंदापूर जि पुणे* असे सांगितले सदरील इसम हा वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे  माहे मार्च महिन्यात *गु र नं ४९/२०२० भा द वी का कलम ३९४,३४*  दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्यात वरील *आरोपी हा गेली ७ महिने पासून फरार* होता त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे तो सांगत आहे वरील आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे,सदरची कारवाई ही मा पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे,पो हवा अनिल काळे,पो हवा रविराज कोकरे,पो हवा ज्ञानेश्वर क्षिरसागर,पो ना प्रवीण मोरे, पो ना अभिजित एकशिंगे, पो ना विजय कांचन,पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News