केंद्र शासनाने साखर निर्यात धोरण लवकर जाहीर करून कारखान्यांची मागील देणी द्यावी !! - आ.आशुतोष काळे


केंद्र शासनाने साखर निर्यात धोरण लवकर जाहीर करून कारखान्यांची मागील देणी द्यावी !!  - आ.आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०/२० या वर्षाच्या ६६ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे, कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे,समवेत उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक मंडळ, पदाधिकारी  व कार्यकर्ते.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 ऊसदर जाहीर करणारा जिल्ह्यतील पहिलाच कारखाना ! 

ऊसाला पहिला हफ्ता २५००, देउन दिलेला शब्द पूर्ण केला तसेच मागील वर्षीच्या ऊसाला अतिरिक्त प्र.टन १०० रुपये  व   कामगारांना १८टक्के  बोनस !!  –  आशुतोष काळे  कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा ६६ वा गळीत हंगाम सुरु !! 

फेसबुकच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घरबसल्या पाहिला कार्यक्रम !!

चालू गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी देशामध्ये अंदाजे ११० लाख टन साखर शिल्लक आहे. चालू हंगामात साखर उत्पादन व देशातील साखरेचा खप याचा विचार केल्यास १७० लाख टन साखर शिल्लक राहील असा अंदाज असल्यामुळे केंद्र शासनाने साखर निर्यात धोरण घेवून कारखान्यांना मागील देणी तातडीने द्यावी असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी केले असून यावर्षी गळीताला येणाऱ्या ऊसाला पहिला हफ्ता २५०० रुपये देण्याचे जाहीर करून ऊस दराच्या बाबत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२०/२१  या वर्षाच्या ६६ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ संचालक व उद्योग  समुहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे होते.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०/२१ या वर्षाच्या ६६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या  हस्ते विधिवत पूजन करून गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा कार्यक्रम घरबसल्या पाहता यावा यासाठी  या कार्यक्रमाचे  लाईव्ह प्रक्षेपण  आमदार आशुतोष काळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते. याप्रसंगी  बोलतांना  ते पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने साखर उद्योगाच्या बाबतीत ज्या ज्या वेळी काही चांगले निर्णय घेतले त्या त्या वेळी केंद्र सरकारच्या त्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावर्षी देशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ऊसाच्या माध्यमातून होणाऱ्या साखर उत्पादनाचा विचार करून लवकरात लवकर साखर निर्यातीचा निर्णय केंद्र शासनाने घ्यावा. शासनाकडून येणे असलेल्या परताव्याबाबत शासनाने सुचविलेल्या मार्गदर्शक प्रणालीनुसार आवश्यक कागद पत्रांची पूर्तता करून सर्व अनुदान प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविली आहेत. त्यापैकी एक रुपया देखील केंद्र शासनाने दिलेला नसून त्याचा परिणाम कारखान्याची रोखता व लाभदायकता यावर होवून आर्थिक कोंडी निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली. त्यासाठी हि देणी केंद्र शासनाने लवकरात लवकर द्यावी. कारखान्याला व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत असून याबाबत शेतकऱ्यांचे कैवारी शरदचंद्रजी पवार साहेब पुढाकार घेवून हा प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्र शासनाने साखरेची किमान विक्री किंमत (MSP) हि प्रती किलो ३१ रुपये ठरविली असून त्यामध्ये वाढ करण्याची भारतीय कृषी मुल्य आयोगाने (CACP) शिफारस केलेली असून आजपर्यंत केंद्र शासनाने निर्णय घेतलेला नाही. केंद्र शासनाने मागील वर्षीच्या एफ. आर. पी. मध्ये १०० रुपये वाढ करून १० टक्के रिकव्हरी साठी प्रतीटन २,८५०/- व पुढील १ टक्के रिकव्हरीस प्रतीटन २८५ रुपये दर द्यावा लागणार आहे. मात्र कारखान्याची एफआरपी कितीही येत असली तरी कारखान्याने यापूर्वी देखील जास्त उस दर दिलेला आहे. राज्यातील व जिल्हातील बहुतेक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होत असले तरी ऊस दराबाबत जाहीर वाच्यता झालेली नाही. मात्र ज्याप्रमाणे माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी आजवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासून एफआरपी पेक्षा जास्त ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवून यावर्षी देखील कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील असा कोणताही भेदभाव न करता सरसकट प्रती टन २५०० रुपये पहिली उचल देणार आहे. मागील वर्षी देखील प्रती टन २५०० रुपये दर देवून यावरच थांबणार नसल्याचा शब्द दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करून मागील वर्षीच्या ऊसाला अतिरिक्त प्रती टन १०० रुपये व मागील मागील वर्षीप्रमाणे कामगारांना १८ टक्के बोनस देवून ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांची दिवाळी गोड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावर्षी कार्यक्षेत्रात ५.२५ लाख मे. टन व कार्यक्षेत्राबाहेर १.२५ मे.टन असे एकून ६.५० लाख टनाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र यावर्षीच्या गळीत हंगामावर कोरोनाचे सावट असल्यामुळे सर्वांनी विशेष काळजी घेवून मास्क, सॅनिटायझर व सोशल डीस्टंसिंग चे पालन करून गळीत हंगाम यशस्वी करावा असे आवाहन केले.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, सभापती सौ. पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य,  सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, पदाधिकारी तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप,  जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, वर्क्स मॅनेजर दौलतराव चव्हाण, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, आदी मान्यवर  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर उपाध्य्यक्ष सुधाकर रोहोम  यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 १) ऊस तोडणी शेतमजुरांना दरवाढीचा निर्णय कारखाना व्यवस्थापणाने स्वीकारला असून जाणते राजे शरदचंद्रजी पवार यांनी ऊस तोडणी शेतमजुरांना १४ टक्के दरवाढ देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कारखाना करणार आहे. मात्र साखर कामगार याचे पगार वाढीबाबत शासनाने नेमलेल्या त्रिपक्षीय कराराची मुदत उलटून दीड वर्षाचा कालावधी झाला असून देखील त्रिपक्षीय समितीने अजून योग्य निर्णय घेतलेला नाही तो निर्णय तातडीने घ्यावा कारखाना त्याची देखील अंमलबजावणी करू मात्र तो निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने घेवू नये.- आ. आशुतोष काळे

- २) आपण माझ्यावर टाकलेली जबाबदारी व दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी बांधील आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघातील महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळत आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात विकास करून दाखविण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार – आ. आशुतोष काळे  



जाहिरात
Search
विडिओ
Recent News