आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेतंर्गत बेघरांना रविवारी जागेसाठी मोफत अर्जाचे वाटप


आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेतंर्गत  बेघरांना रविवारी जागेसाठी मोफत अर्जाचे वाटप

इसळक-निंबळकची प्रस्तावित जागा पहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेतंर्गत इसळक-निंबळक येथे घरकुल वंचितांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून, रविवार दि.1 नोव्हेंबर रोजी प्रकल्पाच्या ठिकाणी माजी कुलगुरु सर्जेराव निमसे व कॉ. बाबा आरगडे यांच्या हस्ते मोफत अर्ज वाटप केले जाणार आहे. शहरातील बेघरांनी प्रत्यक्ष जागेची पहाणी करुन अर्ज घेऊन जाण्याचे आवाहन अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केले आहे. 

इसळक-निंबळक येथील सर्व्हे नं. 54 या 10 एकरच्या खडकाळ पड जमीनीवर 231 प्लॉट पाडण्यात आले आहे. सदर 1 गुंठ्याचे प्लॉट हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून घरकुल वंचितांना अवघ्या 80 हजार रुपयात मिळणार आहे. ज्या घरकुल वंचितांची महापालिकेत नोंद आहे. अशा लाभार्थींना सदर जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जागा मालक असलेले उद्योजक प्रसाद डोके यांचे वडिल वृक्षमित्र तथा पर्यावरणप्रेमी कै.बलभीम डोके यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व त्यांनी साकारलेल्या जंगलपेर काठी स्मारकाच्या पूजनाने नोंदणी अर्जाचे वाटप केले जाणार आहे. घरकुल वंचितांनी मोफत अर्ज घेऊन धनादेश किंवा डिमांडड्राफ्टद्वारे जागा मालकाशी व्यवहार पुर्ण करुन जागेचा ताबा घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. तर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात देण्यात येणारे अनुदान व बँकेचे कर्ज प्रकरण करुन घर बांधणीचा प्रकल्प हाती घेता येणार आहे. दिवाळीपुर्वी घरकुल वंचितांनी नोंदणी पुर्ण करण्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

कै.बलभिम डोके यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी भूमिका बजावली. जंगलपेर काठी असतित्वात आणून मोठ्या प्रमाणात जंगलपेर अभियान राबविले. त्यांच्या मुलाने सामाजिक बांधिलकी जोपासत घरकुल वंचितांसाठी वाजवी किंमतीत जागा उपलब्ध करुन दिल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा, सखुबाई बोरगे, पोपट भोसले, सुमन जोमदे आदि प्रयत्नशील आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News