दहशत पसरवणे,खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यात अडीच वर्षांपासून फरार आरोपी बटऱ्याभाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोकिसंकडून अटक


दहशत पसरवणे,खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यात अडीच वर्षांपासून फरार आरोपी बटऱ्याभाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोकिसंकडून अटक

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

हवेली -- दिनांक 12/10/2018 रोजी गावात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने 10 ते 12 लोकांचे टोळके हातात तलवार,कोयते,गावठी कट्टा,काठ्या घेऊन  समोर येईल त्या गाडीच्या काचा,दुकानांच्या काचा,फोडून रस्त्यात प्रवास करणार्यांना मारहाण करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये आशिष सिद्धार्थ सोनवणे आणि त्यांचे सहकारी सूरज रमेश गबदुले हे दोघेजण हा गोंधळ पाहून गाडी रस्त्याच्या कडेला लावून उभे राहिले होते त्यावेळी त्या टोळीतील  अभिजित गाडे,प्रसाद भोरपकर,निरंजन यादव उर्फ बिबट्या,स्वप्निल मारणे व इतर 8 ते 10 जणांनी सोनवणे यांच्या  उजव्या हातावर कोयत्याने वार केला,तसेच पायावर तलवारीने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला तसेच सहकारी गबदुले यांनाही जबर मारहाण करून जखमी केले होते,त्यांनी तशी फिर्याद हवेली पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 60/2018 भा द वि कलम 307,427,504,144 तसेच शस्त्र अधिनियम 425,मालमत्ता नुकसान अधिनियम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करण्यात आली होती परंतू मुख्य आरोपी अभिजित उर्फ बटऱ्याभाई गाडे राहणार धायरी रायकर नगर हा तेव्हा पासून फरार होता,त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिले होते  अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीक्षक सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सूचना मिळाल्या होत्या त्यानुसार त्यांनी पो सब इन्स्पेक्टर अमोल गोरे,पो उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे,सहायक फौजदार दिलीप जाधवर,पो हवा काशीनाथ राजापूरे,पो नाईक राजू मोमीन,चंद्रकांत जाधव,पोलीस शिपाई अमोल शेंडगे,मंगेश भगत,बाळासाहेब खडके,सुधीर अहिवळे,अक्षय जावळे याना योग्य सूचना देण्यात आल्या होत्या,सदर पथकास 29/10/20 रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत पक्की खबर मिळाली की अभिजित गाडे हा नांदेड फाटा येथे येणार असून त्याच्याकडे गावठी कट्टा आहे,त्यानुसार सदर पथकाने तेथे सापळा लावून मोठ्या शिताफीने अभिजित उर्फ बटऱ्याभाई याला ताब्यात घेतले, त्याची झडती घेतली असता त्यांचेकडे गावठी कट्टा आणि दोन जीवंत काडतुसे मिळाली आहेत,त्याला पुढील कारवाई साठी हवेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News