बारामती : प्रतिनिधी(काशिनाथ पिंगळे)
बारामती तालुक्यातील लोणी भापकर, पळशी या परिसरात आयडिया व व्होडाफोन या दोन्ही मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या पंधरवड्यापासून याठिकाणी कॉल येत नाहीत किंवा जात नाहीत आणि जर एखादा फोन आला आणि उचलला तर मध्येच आवाज गायब होतो किंवा अडखळत आवाज येतो. याअभावी फोन कट करावा लागतो.
तसेच मोबाईलला रेंज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, क्लासेस, झूम मिटिंग तसेच ऑनलाईन परीक्षा इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत विचारणा केली असता एक-दोन दिवसात प्रॉब्लेम सॉल होईल असे सांगण्यात आले.