निमगाव वाघा येथे रविवारी बिरोबा होईकाचे आयोजन


निमगाव वाघा येथे रविवारी बिरोबा होईकाचे आयोजन

भविष्यातील शुभ, अशुभ घटणांचे सांगण्यात येणार भाकित

देवाच्या भगताची गावातून वाजतगाजत मिरवणुक

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - भविष्यातील शुभ, अशुभ घटणांचे भाकित सांगणार्‍या बिरोबा होईकाचे रविवार दि.1 नोव्हेंबर रोजी नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे बिरोबाच्या मंदिरात आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह राज्यात निमगाव वाघा येथील होईक प्रसिध्द असून, भविष्यवाणी ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत असतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये व फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन होईक होणार आहे.  

बुधवार दि.28 ऑक्टोबर रोजी देवाचे भगत नामदेव भुसारे यांची वाजतगाजत गावातून मिरवणुक काढण्यात आली.  यावेळी डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी भुसारे यांचे स्वागत केले. मिरवणुकीच्या समारोपानंतर चार दिवसासाठी ते बिरोबा मंदिरात देवा जवळ बसले असून, दररोज देवाची पुजा करीत आहेत. मंदिरात संध्याकाळी देवाचे ओव्या गायल्या जातात. शनिवार दि.31 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी गावात छबीना मिरवणुक निघणार आहे. तर रविवारी सकाळी 10:30 वा. नामदेव भुसारे यांच्या अंगात वारे संचारल्या नंतर ते पुढील वर्षाचे होईक (भविष्य) सांगणार असल्याची माहिती पै.नाना डोंगरे यांनी दिली.

मागील वर्षी सांगण्यात आलेली त्यांची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली असून, दरवर्षी होईक एकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक गर्दी करतात. होईक नंतरभाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब जाधव, रामदास वाखारे, नाना डोंगरे, मल्हारी शिंदे, अंशाबापू शिंदे, बाबा पुंड, संजय डोंगरे, पांडुरंग गुंजाळ, बबन कापसे, बाळू भुसारे, रोहीदास रोहकले, अशोक भुसारे, परबती कदम, अंबादास निकम, बशीर शेख, नवनाथ जाधव, ठकाराम शिंदे, रावसाहेब भुसारे, एकनाथ भुसारे, बाबा चारुडे, राजू भुसारे, शिवाजी पुंड, अरुण पुंड, अक्षय पुंड आदी परिश्रम घेत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News