महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मिलिंद शेंडगे


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मिलिंद शेंडगे

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मिलिंद शेंडगे यांची निवड करण्यात आली. श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात मंगळवार दि. २७ रोजी झालेल्या बैठकीत पुणे येथील मिलिंद शेंडगे यांना नियुक्तीचे पत्र संघाचे संस्थापक, अध्यक्ष शेख बरकत अली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बैठकीचे सूत्रसंचालन संघाचे प्रदेश महासचिव शेख फकीर मोहम्मद यांनी केले. 

     यावेळी पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचा विस्तार करणे बाबत चर्चा करण्यात आली. तसेच नवोदित जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे यांना पुणे जिल्ह्यात संघ वाढीबाबत सूचना देण्यात आली. कै. वसंतराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ जानेवारी २०२१ मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. 

     मिलिंद शेंडगे यांचा वृत्तपत्र क्षेत्रातील दहा वर्षांचा कार्यकाळ व त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेता या पदावर त्यांची निवड करण्यात आल्याचे शेख बरकत अली यांनी सांगितले.

     संघाच्या वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत व संघाच्या ध्येय-धोरणांना, नियमांना अधिन राहून पुणे जिल्ह्यात नव्या जोमाने संघाची बांधणी करणार, संघ वाढवण्याचे काम करणार व येथील स्थानिक पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी शासन दरबारी देखील आवाज उठविणार असल्याचे मत शेंडगे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

     बैठकीस महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, प्रदेश महासचिव शेख फकीर मोहम्मद, प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जागीरदार, प्रदेश सचिव किशोर गाडे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख, गुलाब वायरमन, संगमनेर तालुकाध्यक्ष दस्तगीर शाह, अक्रम वाय. कुरेशी आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News