मिलिंद शेंडगे
वरवंड : येथील जुन्या काळातील शिक्षक रघुनाथ भिकू धुमाळ (गुरुजी) यांचे मंगळवार दि. २७ रोजी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७६ वर्षांचे होते. शिक्षक म्हणून त्यांनी १३/०८/१९६४ ते ३१/०५/२००२ या कालावधीत काम केले होते. आपल्या कार्यकालात त्यांनी शिक्षणाचा उत्तम प्रसार केला व आदर्श विद्यार्थी घडविले. त्यांनी एकूण ३८ वर्षे शिक्षकी पेशात सेवा बजावली होती. विद्यार्थी वर्गात ते कडक शिस्तीचे आणि तितकेच प्रेमळ व मनमेळावू म्हणून प्रसिद्ध होते. शाळेतील मुलांसोबतच आपल्या मुलांनादेखील त्यांनी उत्तम शिकवण दिली व त्यांचे आयुष्य घडविले.
कै. धुमाळ यांच्या अशा अचानक जाण्याने वरवंड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक आदर्श शिक्षक गमावल्याची भावना अनेकांनी प्रकट केली. त्यांच्या मागे तीन विवाहीत मुली, दोन मुले, दहा नातवंडे असा परिवार आहे. दैनिक लोकमतचे पत्रकार संदीप धुमाळ यांचे ते वडील होते.