कुरकुंभ रासायनिक दूषित पाणी पिल्याने १२मेंढ्या मृत्युमुखी


कुरकुंभ रासायनिक दूषित पाणी पिल्याने  १२मेंढ्या मृत्युमुखी

सुरेश बागल  दौंड प्रतिनिधी :

कुरकुंभ  (ता.दौंड) एमआयडीसीतील रसायनिक दूषित पाणी पिल्याने १२ मेंढ्या मृत्युमुखी झाल्या. कुरकुंभ एमआयडीसी मध्ये केमिकलयुक्त दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आजूबाजूची सर्व शेती नापीक झाली आहे .पाटस येथील मोटेवाडा येथील लाला आबा बरकडे व रामा शिवा बरकडेषआणि एकूण चार कुटुंबातील ३५० ते ४०० मेंढ्यांचा कळप आहे. बरकडे कुटुंब मेंढ्या घेऊन पाटस वरून कुरकुंभ मार्गे नाशिकला चालले होते. कुरकुंभ चौकात न जाता मधल्या मार्गे एमआयडीसी चौकातुन गेल्यावर मेंढपाळ मेंढ्या घेऊन चालत असताना काही मेंढ्या अचानक कमी दिसू लागल्या.होनर लॅब,बरजेलीस केमिकल कंपनी, आणि मीरा केमिकल या कंपनी समोरून केमिकलयुक्त पाणी वाहत होते मेंढ्यांना तहान लागल्याने केमिकलयुक्त दूषित पाणी पिल्याने १२ मेंढ्या मृत्युमुखी झाल्या आहेत . मेंढपाळ बरकडे यांनी सांगितले.पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना ही घटना समजताच तात्काळ येऊन स्वतः पाहणी करून मेंढपाळ यांची चौकशी करून मेलेल्या मेंढ्यांचे सरकारी डॉक्टर यांना सांगून पोस्टमोटम करण्याचे आदेश दिले. आणि केमिकल युक्त पाणी चेक केले जाईल तसेच बरकडे मेंढपाळ यांना न्याय मिळवून दिला जाईल असे सांगितले. यावेळी पोलीस अधिकारी के. बी. शिंदे ,हवालदार पंडित मांजरे ,राऊत उपस्थित होते. मेंढपाळ यांनी मेंढ्यांची अवस्था पाहून ताक आणि मेडिकल मधील औषधे आणून पाजली परंतू मेंढ्या वाचवण्यासाठी अपयश आले.मेंढ्या मेल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे .प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मेंढपाळ  बरकडे  यांनी केलेली आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी एमआयडीसी कार्यालय आणि महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ,मेंढपाळ यांच्याकडून मागणी होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News