जनहित मानवाधिकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी पत्रकार कैलास पवार यांची नियुक्ती .


जनहित मानवाधिकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी पत्रकार कैलास पवार यांची नियुक्ती .

काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी: ( दि. २९ऑक्टोंबर ) :ह्युमन राइट्स, जनहित मानवाधिकार (ह्युमन राइट्स,)महाराष्ट्र राज्य, भारत या संघाच्या पूणे जिल्हाध्यक्षपदी पत्रकार कैलास पवार यांची निवड करण्यात आली. संघाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष एस .एच.पाखरे यांच्या आदेशानुसार ह्युमन राइट्स सोशल मीडिया पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश इटकर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.पत्रकार कैलास पवार यांनी आपल्या निर्भीड लेखणीतून शेतकरी, सामाजिक, पूरपरिस्थिती, दुष्काळ तसेच समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करत आहेत. तसेच त्यांना अनेक ग्रामीण, राज्य, समाज भूषण अशा अनेक पुरस्कार सन्मानित  केले आहे. नूतन पुणे जिल्हाध्यक्ष कैलास पवार यांनी निवडीनंतर आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, बहुजन सुखाय बहुजन हिताय  या  ब्रीदवाक्य प्रमाणे  छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सुभाषचंद्र बोस,महात्मा गांधी अशा थोर विचारवंतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या सेवेसाठी काम करणार आहे. या संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब दलित,वंचित या सर्वच घटकांच्या नागरिकांच्या अडी-अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असून आणि संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम करणार आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक, शिक्षण, कला, क्रीडा, नाट्य अनेक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्याचे काम करणार असल्याचे कैलास पवार यांनी सांगितले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्षपदी अनिल जाधव,बार्शी तालुका अध्यक्षपदी निलेश मुद्दे,पुणे महिला आघाडी शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई कुसाळकर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ह्युमन राइट्स सोशल मीडिया पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश इटकर यांनी अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News