मा.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते ह.भ.प भिमराज महाराज जाधव व परशुराम महारज अनर्थे यांचा सत्कार !!


मा.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते ह.भ.प भिमराज महाराज जाधव व परशुराम महारज अनर्थे यांचा सत्कार !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

       अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कोपरगाव शहर सप्ताह व दिंडीच्या प्रमुखपदी भिमराज महाराज जाधव यांची व परशुराम महाराज अनर्थे यांची अहमदनगर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे माजी.नगराध्यक्ष. मंगेश पाटील यांनी शाल,श्रीफळ व पुष्पहार घालुन त्यांचा सत्कार केला.

 अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ. प. प्रकाश महाराज बोधले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह. भ. प. अनिल महाराज वाळके आणि नगर जिल्हाध्यक्ष ह. भ. प. गणेश महाराज डोंगरे यांनी तिन वर्षासाठी ही नियुक्ती केली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नियमावलीनुसार या पदाधीका-यांना वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार, दिंडी व अन्य कामे करावयाची आहे.

 भिमराज जाधव हे गेल्या तीन दशकांपासून महाराष्ट्रभर प्रवचन व कीर्तन या माध्यमातुना तसेच वारकरी संप्रदयाचा प्रचार व प्रसार व समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत.त्यांनी कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात दक्षिणमुखी हनुमान मंदिराची उभारणी केली आहे.तसेच परशुराम महाराज अनर्थे यांनी ही अनेक सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवला आहे.तसेच महाराज गेल्या 12 वर्षांपासून जवळजवळ दर वर्षी 50 अनाथ मुलांना, भोजडे येथील आपल्याया आश्रमात शिक्षण देत आहे. लग्न करण्याची परीस्थिती नसलेल्या गरीब व गरजुंच्या मुलींची लग्ने ही महाराजांनी लावुन दिली आहेत तसेच गावो गावी प्रवचन करून त्यातून समाज प्रबोधन करत आहेत अश्या या हरीभक्तांच्या कार्यास माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी साष्टांग दंडवत घातला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News