कुरकुंभ MIDC केमिकल मिश्रित पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, 40 मेंढ्याना विषबाधा, 17 मृत्युमुखी, चौकशी करण्याची मागणी


कुरकुंभ MIDC केमिकल मिश्रित पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, 40 मेंढ्याना विषबाधा, 17 मृत्युमुखी, चौकशी करण्याची मागणी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

कुरकुंभ MIDC मध्ये केमिकल मिश्रित पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे,आता पर्यंत परिसरातील शेतकऱ्यांनी कितीतरी वेळा या विषयी आमदार, खासदार, मंत्री यांच्याकडे केमिकल मिश्रित पाण्याची कैफियत मांडली परंतू तात्पुरती जुजबी कारवाई करून प्रकरण सोडून दिले जाते, आजूबाजूची सर्व शेती नापीक झाली आहे, जनावरे तर किती मरतात त्याला मर्यादा नाही,कंपन्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच, लोकांचे लक्ष हटत नाही तोपर्यंत काळजी घेतली जाते, आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी दयनीय अवस्था  येथील शेतकऱ्यांची आहे,आणि कंपनी स्फोट तर नित्याचेच झाले आहेत, तेथील लोक जीव मुठीत धरून रहात आहेत,कधी कोणत्या कंपनीला आग लागेल काही सांगता येत नाही, आज पाटस येथील मेंढपाळ कुरकुंभ वसाहतीमध्ये डोंगराळ भागात मेंढ्या चरण्यासाठी घेऊन आले होते, तेथेच कंपनीतील केमिकल मिश्रित पाणी तेथून वाहत होते ते पाणी काही मेंढ्या पिल्या आणि काही वेळातच पटापट खाली कोसळल्या,त्यातील 40 मेंढ्याना पाण्याची बाधा झाली,तर 17 मेंढ्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत,ही माहिती हाती आली तोपर्यंत ही परिस्थिती होती अजूनही काही मेंढ्या दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही, सदर मेंढपाळ यांना नुकसान भरपाई मिळून सदर कंपनीवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News