वारकरी मंडळाच्या कोपरगाव़ शहराध्यक्षपदी ह.भ.प.भीमराज महाराज जाधव !!


वारकरी मंडळाच्या कोपरगाव़ शहराध्यक्षपदी  ह.भ.प.भीमराज महाराज जाधव !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कोपरगाव शहर सप्ताह व दिंडीच्या प्रमुखपदी भीमरा ज महाराज जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तीन वर्षांसाठी ही निवड आहे.अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ. प. प्रकाश महाराज बोधले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह. भ. प. अनिल महाराज वाळके आणि नगर जिल्हाध्यक्ष ह. भ. प. गणेश महाराज डोंगरे यांनी ही नियुक्ती केली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नियमावलीनुसार जाधव यांना वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार, दिंडी व अन्य कामे करायची आहेत. जाधव हे गेल्या तीन दशकांपासून महाराष्ट्रभर प्रवचन आणि कीर्तने करीत आहेत. त्यांनी कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर भागात दक्षिणमुखी हनुमान मंदिराची उभारणी केली आहे. अनेक सामाजिक कामांत ते सहभागी असतात.यांचा सत्कार  ह.भ.प वामनराव कदम,ह.भ.प.साहेबराव आहेर,ह.भ.प.वीनायक राजगुरु,ह.भ.प.आसाराम कदम,ह.भ.प.भाईजी कदम,ह.भ.प.रामदास शींनगर पाटील,ह.भ.प.बापु व्हडने,ह.भ.प.परसुराम आनार्थे,ह.भ.प.गीरीश हीवाळे,ह.भ.प.नंदु तांबट,ह.भ.प.संजय जाधव,ह.भ.प.भाऊसाहेब जाधव,ह.भ.प.रमेश गायकवाड,ह.भ.प.दत्तोबा जोर्वेकर,ह.भ.प.कुळधरन सर,यांनी केला.तसेच कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ह.भ.प.भीमराज महाराज जाधव यांचे सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सत्कार मुर्ती भीमराज महाराज जाधव  यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष भिमराज जाधव यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News