ओबीसी समाजातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा - मुकुंद काळे


ओबीसी समाजातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा - मुकुंद काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव - गेले अनेकवर्षापासुन ओबीसी समाजाच्या मागण्या तसेच प्रलंबित प्रश्न आजही मंजुर झालेले नसुन त्वरीत मान्य होण्यासाठी शासकीय स्तरावरुन पाठपुरावा व्हावा या मागणीचे निवेदन अखिल भारतीय युवक संघ तसेच ओबीसी बांधवाच्या वतीने कोपरगांव तहसिलदार यांना निवदेन देण्यात आले. राज्यातील एकुण लोकसंख्येच्या 52 टक्के लोकसंख्या इतर मागासवर्गीय आहे. राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्याथ्र्यांची संख्या विचारात घेता महाज्योती या संस्थेकरिता जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यात यावा, राज्यातील विद्याथ्र्याकरिता 1000 कोटी इतकी शिष्यवृत्ती प्रलंबित असुन सन 2020-21 या वर्षासाठी रु. 2000 कोटीची तरतुद केली असुन शिष्यवृत्तीसाठी एकुण 3000 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणे आवष्यक आहे., राज्यातील इमाव व बहूजन समाजातील विद्याथ्र्यांसाठी प्रत्येक जिल्हयात मुलांसाठी 1, मुलींसाठी 1 अशी एकुण 72 वस्तीगृहे सुरु करावी, ओबीसी समाजाच्या गुणवत्ताधारक  विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देण्याबाबत मंत्री मंडळाने निर्णय घेतला असुन राज्यातील ओबीसी समाजाच्या 5500 गुणवत्ताधारक विद्याथ्र्यांना राज्यातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी मोठया रक्कमेची तरतुद करण्यात यावी. शासकीय सेवेतील इतर मागासवर्गीयांचा रिक्त पदाचा अनुशेष तातडीने भरण्याबाबत कार्यवाही सुरु करावी, राज्य शासना मार्फत नियोजित असलेली पोलीस भरतीसह कुठलीही भरती प्रक्रिया थांबविण्यात येवु नये., महाराष्ट्र शासनाकडुन विविध प्रवर्गातील पात्र विद्याथ्र्यांना शासकीय वस्तीगृहाचा लाभ मिळालेला नाही. या विद्यार्थ्यांना दरवर्षी साठ हजार रुपये स्वाधार निधी दिला जातो त्याप्रमाणे ओबीसी विद्याथ्र्यांना स्वाधार निधी देण्यात यावा. आदि मागण्यांचे देखील निवेदन दिले आहे. सदरचे निवदेन अखिल भारतीय श्री. संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी युवक समितीचे पदाधिकारी सतिष केकाण, संकेत केकाण, देवेश माळवदे, विलासराव माळी, विजय साळुंके,अखिल भारतीय श्री.संत सावता माळी युवक संघाचे उत्तर नगरजिल्हाध्यक्ष मुंकुंद काळे, महात्मा फुले मंडळाचे प्रदीप नवले, नगरसेवक वैभव गिरमे,  तालुकाध्यक्ष अषोक माळवदे, शहराध्यक्ष शेखर बोरावके, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य डाॅ. मनोज भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा सहसिचव मनिष जाधव, संतोष रांधव, संदिप डोखे, योगेश ससाणे, मनोज चोपडे, अनंत वाकचैरे निवदेन प्रसंगी उपस्थितीत होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News