आमदार काळेंच्या पाठपुराव्यातून नगर-मनमाड महामार्गाचे खड्डे बुजवण्यास प्रारंभ !!


आमदार काळेंच्या पाठपुराव्यातून नगर-मनमाड महामार्गाचे खड्डे बुजवण्यास प्रारंभ !!

अहमदनगर–मनमाड महामार्गाच्या खड्डे बुजवण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. जीवघेण्याठरलेल्याअहमदनगर–मनमाड महामार्गाच्या खड्डे बुजवण्याच्या कामास आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून बुधवार (दि.२८) पासून कोपरगाव येथील येवला नाका परिसरातून प्रारंभ करण्यात आला असून कोपरगाव येवला नाका ते सावळीविहीर पर्यंतच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करू अशी माहिती जागतिक बँक अभियंता अंकुश पालवे यांनी दिली आहे.

          मागील अनेक दिवसांपासुन अहमदनगर-मनमाड राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघात होवून हा मार्ग कळीचा मुद्दा बनला होता.अहमदनगर-मनमाड राज्य मार्गाची झालेली दुरावस्था व यावर्षी मोठ्याप्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे रस्त्याची वाताहत होवून हा महामार्ग अक्षरशः मृत्युचा सापळा झाला होता. या राज्यमार्गाची खड्ड्यांमुळे झालेली वास्तव परिस्थिती आमदार आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोक चव्हाण यांची मागील महिन्यात भेट घेवून त्यांच्यापुढे मांडली होती. या महामार्गाची वेळेत दुरुस्ती झाली नाही तर अपघाताची संख्या वाढून अनेकांना आपला जीव गमवावा लागू शकतो त्यासाठी या राज्य मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी केली होती. सदर मागणीची दखल घेवून अहमदनगर-मनमाड या राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी नामदार अशोक चव्हाण यांनी ४० कोटी रूपये निधी मंजूर केला होता. त्या निधीच्या माध्यमातून या मार्गावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आल्यामुळे या महामार्गावरून नियमितपणे ये-जा करणाऱ्या वाहन धारकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

                    यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने यांच्यासोबत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, बाळासाहेब बारहाते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक मंदार पहाडे,संदीप पगारे,सुनील शिलेदार,राजेंद्र वाकचौरे,रमेश गवळी,राहुल जगधने,सोमनाथ आढाव,अभिजित सरोदे, कार्तिक सरदार,आकाश डागा, कृष्णा वालझडे आदी उपस्थित होते.

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News