नटराज कोव्हिड सेंटरमध्ये सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांना मिठाई वाटप


नटराज कोव्हिड सेंटरमध्ये सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांना मिठाई वाटप

  नगर- (प्रतिनिधी संजय सावंत) भारतीय जनता पार्टी, महापालिका व पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या नटराज कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना वैद्यकीय व इतर सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने सर्वांना मिठाई वाटून सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक महेंद्र गंधे, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, कोव्हिड सेंटरचे व्यवस्थापक पी.डी.कुलकर्णी, निलेश चिपाडे, सचिन पारखी, महेश नामदे आदिंसह उपचार करणारे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

     यावेळी महेंद्र गंधे म्हणाले, नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून नटराज कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट सेवा व मोफत उपचार रुग्णांवर झाले. त्यामुळे या ठिकाणाहून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक होते. आता कोरोनाची लाट नियंत्रणात येत आहे, त्यामुळे नगर शहरातील बरेचशे कोव्हिड उपचार केंद्र बंद झालेली आहेत. मात्र नटराज कोव्हिड सेंटर हे बंद न करता शेवटचा रुग्ण असे पर्यंत सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी चालू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.वसंत लोढा म्हणाले, नगर शहरात वाढत असलेला कोव्हिडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तातडीने आम्ही नटराज कोव्हिड सेंटर सुरु केले. शहरातील व जिल्ह्यातील हजारो रुग्ण या कोव्हिड सेंटरमधून मोफत उपचार घेऊन कोरोनावर मात करुन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकही मृत्यू या ठिकाणी झालेला नाही, हे या सेंटरमध्ये  सेवा देणार्‍या डॉक्टर्स, नर्स व कर्मचार्‍यांचे यश आहे. या ठिकाणी सेवा देणारे निलेश चिपाडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व डॉक्टर्स व कर्मचार्‍यांना मिठाई वाटप करुन चांगला उपक्रम राबविला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News