निमगाव वाघा ग्रामस्थांचे रस्त्याच्या कामासाठी आमदार लंके यांना निवेदन


निमगाव वाघा ग्रामस्थांचे रस्त्याच्या कामासाठी आमदार लंके यांना निवेदन

निमगाव वाघा ते हिंगणगाव फाटा रस्ता करण्याची मागणी

 अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) नगर तालुक्यातील निमगाव वाघा ते हिंगणगाव फाटा (कल्याण रोड) रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून, सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे निवेदन निमगाव वाघा येथील ग्रामस्थांनी आमदार निलेश लंके यांना दिले. यावेळी निमगाव वाघा विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक पै.नाना डोंगरे, चंद्रकांत पवार, भाऊसाहेब ठाणगे, अमोल डोंगरे, किरण जाधव, संदीप डोंगरे, रितेश डोंगरे, वैभव पवार, मच्छिंद्र डोंगरे, मुस्ताक शेख, माजी सरपंच साहेबराव बोडखे, राजेंद्र गुंजाळ आदी उपस्थित होते. 

 निमगाव वाघा ते हिंगणगाव फाटा (कल्याण रोड) हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, येथील ग्रामस्थांना रस्त्यावरुन प्रवास करणे कठिण झाले आहे. अनेक वर्षापासून हा रस्ता खराब झाला आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून, बाराखोंगळा येथील पाझर तलावाचे पाणी रस्त्यावर आल्याने ग्रामस्थांसाठी हा रस्ता पुर्णत: बंद झाला आहे. वस्तीवर राहणार्‍या ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. यामुळे येथील ग्रामस्थांचे मोठे हाल होत असून, तातडीने सदर रस्त्याचे काम मार्गी लाऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News