गेलं दौंड खड्ड्यात भाग- 4 | दौंड शहर विशेष सदरात..


गेलं दौंड खड्ड्यात भाग- 4 | दौंड शहर विशेष सदरात..

दौंड शहरातील अर्धवट रस्ते आणि हैराण जनता,शालीमार चौक ते मीरा सोसायटी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड शहरातील शालीमार चौक ते मीरा सोसायटी पर्यंतच्या अर्धवट रस्त्यामुळे येथील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे, आणि नगरपालिकेकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची तक्रार येथील रहिवासी करीत आहेत,कामाची पूर्तता होत नसल्यामुळे जेष्ठ नागरिक घराबाहेर पडायला धजावत नाहीत त्या कोरोना महामारीची भर पडली, त्यामुळे शाळा कॉलेज सुरू नाहीत खूप अपघात झाले असते,परंतू प्रशासन तरीही डिम्मच आहे,खोदलेल्या खड्ड्यामध्ये पावसाचे तसेच सांडपाणी साचून गटर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे,ठेकेदार सांगूनही दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार येथील रहिवाशी करीत आहेत, आरोग्य विभागाशी संपर्क केला असता सांगतो नंतर,करतो उदया अशी उत्तरे मिळाल्याचे सांगण्यात आले,कोरोना बरोबर या दुर्गंधी मुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे, दसऱ्याच्या दिवशी दोन तीन लोक त्या चिखलात पडले पूजण्यासाठी स्वच्छ केलेल्या गाड्या पुन्हा खराब झाल्याने लोक नाराज झाले, गेल्या सहा महिन्यांपासून हे काम सुरु असून लोक धडपडत त्यातून रस्ता शोधत आहेत,प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News