चोरीची बोलेरो जीपचा पाठलाग करून आरोपी सह बोलोरे ताब्यात : गुन्हा दाखल होण्यापूर्वीच उघडकीस : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची सिनेस्टाईल कामगिरी


चोरीची बोलेरो जीपचा पाठलाग करून आरोपी सह बोलोरे ताब्यात : गुन्हा दाखल होण्यापूर्वीच उघडकीस : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची सिनेस्टाईल कामगिरी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : 

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पवनानगर ता.मावळ येथून चोरीस गेलेल्या बोलेरो जीपचा पाठलाग करून जीपसह आरोपीस पाटस ता.दौंड येथे जेरबंद केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

     दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी पवनानगर ता.मावळ येथून दुपारी ०१.३० वा.चे सुमारास महिंद्रा बोलेरो जीप नं. एमएच १४ सीसी ७९४७ ही चोरीस गेली होती. बोलेरो जीप मालक श्री.मंगेश रामचंद्र कालेकर यांनी दिवसभर गाडीचा शोध घेतल्यानंतर सायंकाळी ०६.०० वाजता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी आले. जीप मालक मंगेश कालेकर यांना त्यांचा कामगार चालक विजय सोनकांबळे हा सुद्धा गायब असल्याने त्यानेच जीप चोरी करून पोबारा केल्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीसांनी तात्काळ चोरी झालेल्या जीपचा नंबर व वर्णनासह माहिती नियंत्रण कक्षा मार्फत वायरलेस व पोलीस व्हॉटसअप ग्रुपवर देवून तिचा शोध घेणेबाबत अंमलदार यांना सुचना दिलेल्या होत्या.

       सदर जीप चोरीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्या नंतर पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी बोलेरो जीप चोरी बाबतची माहिती  स्थानिक गुन्हे शाखेच्या व्हॉटसअप ग्रुपवर सर्व अमलदारांना देवून जीपची माहिती घेणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांना सदर बोलेरो जीप ही पुणे बाजूकडे गेलेली असून ती  पुणे-सोलापूर रोडने आरोपी त्याचे गावी नांदेड येथे घेवून जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे जिल्हयातील व विशेषतः सोलापूर रोडला पेट्रोलिंग करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकास व्हॉटसअप ग्रुपवर माहिती देवून शोध घेणेबाबत व जीप मिळून आल्यास ताब्यात घेणेबाबत कळविले होते. सोलापूर रोडला पेट्रोलिंग करणारे गुन्हे शाखेचे पथकास एमएच १४ सीसी ७९४७ ही बोलेरो जीप पुणे-सोलापूर यवत येथे सोलापूर बाजूकडे जाताना दिसल्याने तिस थांबण्याचा इशारा केला परंतु ती न थांबल्याने तिचा सिनेस्टाइल पाठलाग करून पाटस ता.दौंड येथे चोरीचे बोलेरो जीपसह चालक आरोपी नामे विजय रमेश सोनकांबळे वय २० वर्षे रा.पवनानगर, ता.मावळ जि.पुणे मूळ रा.जयभिमनगर, गल्ली नं.३, नांदेड जि.नांदेड  यास ताब्यात घेतलेले आहे. ताब्यात घेतलेला आरोपी व गुन्हयात चोरलेली बोलेरो जीप पुढील कारवाईसाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेली आहे.

       सदरची कामगिरी ही  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा. सचिन गायकवाड, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, गुरु जाधव यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News