शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना मिळणार,,,,,,जिल्हा अधिकारी, श्री राजेंद्र भोसले


शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना मिळणार,,,,,,जिल्हा अधिकारी, श्री राजेंद्र भोसले

राजेंद्र दूनबळे,  शिर्डी प्रतिनिधी, जिल्हा अधिकारी श्री राजेंद्र भोसले यांनी सांगितले की खंडकरी शेतकऱ्यांची जमिनी शेतकऱ्यांना मिळून देण्याचा प्रयत्न असून, शेती महामंडळाला शेती उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्या जातील,जेणे करून खंडकरी शेतकऱयांना शेती वाटप करण्यासाठी सोपे जाईल ,असे खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या सोमवार दि,  26 ,ऑक्टोबर 2020 रोजी  अहमदनगर येथे झालेल्या बेठकीत त्यांनी सांगितले.

सदर बेठकीस, मा,बी,डी, पाटील,(वालचंदनगर),श्री ,बाळासाहेब जपे पाटील,भाऊसाहेब कातोरे पाटील,(लक्षमीवाडी मळा),डॉ,धनंजय धनवटे(चांगदेवनगर मळा),अण्णा पाटील थोरात,( श्रीरामपूर ) गंगापाटील चोधरी(जळगाव )रावसाहेब काकडे,(बेलवन्डी, श्रीगोंदा) मच्छीन्द्र टेके,,(साकारवाडी) सुधीर नवले ,(श्रीरामपूर) आदी उपस्तीत होते, नूतन जिल्हा अधिकारी भोसले यांचा बाळासाहेब जपे,पाटील,डॉ,धनवटे यांनी व इतर प्रतिनिधींनी स्वागत सत्कार केला

      दिनांक, 30 ,  ऑगस्ट 2011 रोजी  निकाल खंडकरी शेतकऱयांच्या बाजूने लागला आहे ,जवळ जवळ 9 वर्ष होऊन ही अजूनही काही खंडकरी शेतकऱयांना जमिनी वाटप झाल्या नाही, अजूनही अनेक  प्रलंबित  प्रश्न आहेत यात ,जमीन उपलब्ध नाही,वारसाचे वाद, तसेच नमुना क्र 3 प्रमाणे 7 /12 तयार झालेला नाही ,समिती प्रमुखांना जमीन वाटप करतांना होणारी अडचण या सर्व विषयी माहिती बाबत  अहमदनगर चे नूतन जिल्हा अधीकारी श्री ,राजेंद्र भोसले,यांनी खंडकरी शेतकऱयांच्या प्रतिनिधींबरोबर ,नगर येथे बेठकित चर्चा झाली  यात खंडकरी शेतकर्याच्या अडचणी जाणून घेतल्या, व अधीकारी व शेतीमहामंडळास शेती उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News