वीज वाहिनीतून आगीचे गोळे पडल्याने वांगदरी शिवारात तीन एकर ऊस जळून खाक: वीज मंडळाच्या हलगर्जीपणामूळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान.


वीज वाहिनीतून आगीचे गोळे पडल्याने वांगदरी शिवारात तीन एकर ऊस जळून खाक: वीज मंडळाच्या हलगर्जीपणामूळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान.

श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे) दि.२७: मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील गंगाधर तुकाराम शिंदे यांच्या वांगदरी (ता. श्रीगोंदा) शिवारातील गाळपासाठी आलेल्या उसात वीज वितरण कंपनीच्या मुख्य वाहिनीतून विजेचे गोळे पडल्याने मंगळवारी त्यांचा कारखान्याला गाळपासाठी तयार असलेला तीन एकर ऊस जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की मढेवडगाव येथील रहिवासी गंगाधर शिंदे यांची शेजारीच वांगदरी शिवारात ऊस शेती आहे. त्यांच्या ऊस शेतीच्यावरून वीज वितरण कंपनीची मुख्य वीजवाहिनी गेली आहे. परंतु विजेच्या तारेच्या झोळामूळे तारा  एकमेकांना चिकटल्यामूळे आगीचे लोळ तयार होऊन काही दिवसांत तोडणीला आलेल्या उसात पडल्यामूळे ऊसाने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा पाहून आसपासच्या शेतकऱ्यांनी धाव घेत ऊस विझवण्याचा प्रयत्न केला व शेजारी शेजारी जवळपास २५-३० एकर उभा ऊस होता. आगीवर नियंत्रण आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तोपर्यंत ३ एकर ऊस जळून खाक झाला.या नुकसानीत शेतकऱ्याची लाखो रुपयांची हानी झाली आहे.

           घटनास्थळी काष्टी वीज उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. उपअभियंता गैरहजर असल्याने दुसऱ्या दिवशी पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News