पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शेठ ज्योती प्रसाद विद्यालयाचे यश,मोलमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाचे घवघवीत यश


पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शेठ ज्योती प्रसाद विद्यालयाचे यश,मोलमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाचे घवघवीत यश

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

दौंड - सन 2019-20  या शैक्षणिक वर्षात झालेल्या 2019 च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दौंड येथील शेठ ज्योती प्रसाद विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या  वर्गातील तीन विध्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले असल्याची माहिती मुख्याध्यापक प्रदिप म्हस्के यांनी दिली.यामध्ये मोलमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाने 134 गुणांसह प्रथम येऊन शिक्षकांची शाबासकी मिळवली आहे,1) गौरव मोहन धेंडे 134 गुण, 2) प्रतिक विनोद गायकवाड 126 गुण,3) रेहान फिरोज अत्तार 124 गुण हे विध्यार्थी विद्यालयात शिष्यवृत्ती साठी पात्र झाले आहेत, या विद्यार्थ्याचा सत्कार प्रेमसुख कटारिया यांचे हस्ते सत्कार करण्यात आला,या तीनही विध्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव तथा माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया,चेअरमन विक्रम कटारिया,मुख्याध्यापक प्रदिप म्हस्के,सर्व अधिकारी व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी सुनिल शर्मा तसेच इतर मान्यवर व शिक्षक उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News