कोपरगाव शहरात रेशन दुकानदाराकडून पत्रकाराला धक्काबुक्की !!


कोपरगाव शहरात रेशन दुकानदाराकडून पत्रकाराला धक्काबुक्की !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव- आज दि.२७-१०-२० रोजी. कोपरगाव शहरामध्ये खडकी रोड येथे रेशन दुकानदार मधुकर जगन्नाथ पवार रजिस्टर नंबर ए. एन. आर/पी.आर.आओ./ए १२०१/१९७९ दुकान क्रमांक 131 येथे . आज १०-००वा.    श्रमिकराज कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष व महाराष्ट्र व्हॉइस वेब न्यूज चे पत्रकार अजय सदाशिव विघे स्वतःचे  कुपन आणण्यासाठी गेले असता.त्या ठिकाणी दुकानदाराला काट  यासंदर्भात विचारणा केली असता.तो काटा ग्राहकांना पाहता यावा‌.व तुम्ही दिलेले माप बरोबर आहे कि नाही हे ग्राहकांना कळाले पाहिजे.अशी विचारणा केली असता दुकानदारांनी अर्वाच्च भाषा वापरून पत्रकार अजय विघे यांना धक्काबुक्की केली.त्यामुळे अजय विघे यांनी घटनाकार मैत्री संघ सामाजिक संघटना व श्रमिक राज कामगार संघटना यांच्यावतीने तहसीलदार  योगेश चंद्रे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली . त्याचबरोबर प्रत्येक रेशनधारकास 200 ग्राम कमी दिले जाते. याचा देखील  रेशन दुकानदारांचे म्हणणे आले की आम्हाला वरून कट्टा कमी येत असल्याने आम्ही सर्व ग्राहकांना कमी माप देतो.त्याच प्रमाणे एका महिलेला दोन किलो दाळ दिले असता ती दुसऱ्या काट्यावर मोजली असता ती पावणे दोन किलो भरली या सर्व गोष्टीचा मनात राग धरून रेशन दुकानदार मधुकर पवार यांचे चिरंजीव यांना राग येऊन यांनी पत्रकार यांना धक्काबुक्की करून त्या ठिकाणावरून ढकलून दिले. अशी सविस्तर चर्चा तहसीलदार साहेबांना करण्यात आली. व रेशन दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी गौतम बनसोडे घटनाकार मैत्री संघ चे संस्थापक ,राहुल धीवर विशाल आव्हाड गोकुळ दुशिंग शंकरां घोडेराव,संजय ससाने,रवींद्र जगताप,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News