मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने शहरातील घरकुल वंचितांसाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना सुरु


मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने  शहरातील घरकुल वंचितांसाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना सुरु

मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने शहरातील घरकुल वंचितांसाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना सुरु ले आऊट प्लॅनचे पूजन करुन, जागा घेणार्‍यांची नोंदणी सुरु 80 हजार रुपयात मिळणार 1 गुंठा जमीन

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना कार्यान्वीत करण्यात आली असून, हुतात्मा स्मारक येथे ले आऊट प्लॅनचे पूजन करण्यात आले. तर इसळक निंबळक येथे हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून घरकुल वंचितांसाठी 80 हजार रुपयात 1 गुंठा जमीन देण्याच्या प्रकल्पाची नोंदणी सुरु करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, जागा मालकचे प्रतिनिधी प्रदिप झरेकर, राहुल जाधव, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, किशोर मुळे, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा, सखुबाई बोरगे, पोपट भोसले, बबन दिवटे, बापू चांदणे, संतोष लोंढे, संतोष अडागळे, संगीता दिवटे सुमन जोमदे आदींसह घरकुल वंचित उपस्थित होते. 

प्रारंभी महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत करण्यासाठी मागील सहा वर्षापासून प्रयत्नशील होते. संघटनेच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा करुन वेळोवेळी आंदोलन देखील करण्यात आले. मात्र घरकुल वंचितांच्या प्रश्‍नाकडे सरकार लक्ष देण्यास तयार नसल्याने स्वत: संघटनेने पुढाकार घेऊन शहरा जवळील पड जमीन उपलब्ध करुन त्यावर ले आऊट प्लॅन टाकून हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून घरकुल वंचितांना घरांसाठी जागा देण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. निंबळक येथील सर्व्हे नं. 54 या खडकाळ पड जमीनीवर 231 प्लॉट पाडण्यात आले आहे. सदर 1 गुंठ्याचे प्लॉट  हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून घरकुल वंचितांना 80 हजार रुपयात मिळणार आहे. ज्या घरकुल वंचितांची महापालिकेत नोंद आहे. अशा लाभार्थींना सदर जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  

अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, घरकुल वंचितांचा प्रकल्प उभा राहून कॉलनी असतित्वात आल्यास वीज व रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी देखील संघटना प्रयत्नशील राहणार आहे. शहरातील झोपडपट्टी कमी होऊन घरकुल वंचितांच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे. घरकुल वंचितांना दिपाळीची ही खरी भेट ठरणार आहे. महापालिकेत 11 हजार घरकुल वंचितांची यादी प्रलंबीत असून, त्यापैकी प्रथम नोंदणी करणार्‍यांना हे प्लॉट देण्यात येणार आहे. सर्व व्यवहार बँकेच्या माध्यमातून डिमांड ड्राफ्टाद्वारे जमीनीचे मालक उद्योजक शिवराज डोके यांच्याशी होणार असून, ते हाऊसिंग सोसायटीचे मुख्य प्रवर्तक राहणार आहे. सदर जागेवर ले आऊटच्या माध्यमातून 9 मीटरचे रस्ते व अ‍ॅम्युनिटी व ओपन स्पेससाठी जागा सोडण्यात आली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. अशोक सब्बन यांनी मोठ्या संघर्षानंतर स्वत: पुढाकार घेऊन संघटनेने घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. खरतर सरकारने हा प्रश्‍न सोडवायला हवा होता. मात्र आश्‍वासन देऊन डोळ्यात धुळफेक करणारे राज्यकर्त्यांनी घरकुल वंचितांप्रती आस्था नसल्याने संघटनेने पुढाकार घेऊन त्यांचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. इसळक-निंबळक येथे एमआयडीसी जवळ असल्याने रोजगाराचा प्रश्‍न देखील सुटू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News