विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
पुणे- भारत विकास परिषद(स्वारगेट) व संभव फाऊंडेशन तर्फे 34 फोर व्हीलर ड्रायव्हर साठी चे रोड सुरक्षा बदल प्रशिक्षण शिबीर ४३ सुमित प्लाझा मार्केट यार्ड,पुणे येथे २६.१०.२०२० रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका प्रिया गदादे यांनी केले .येळी अध्यक्ष चंद्रकांत दर्डा जेष्ठ समाजसेवक मोतीलाल शहा,संभव फौन्डेशन चे प्रणव ताम्हणकर ,रेखा आखाडे,रघुनाथ ढोक उपस्थितीत होते.
यावेळी नगरसेविका प्रिया गदादे म्हणाले की प्रत्येक फोर व्हीलर ड्रायव्हरने आपल्या कुटुबासाठी सुरक्षित गाडी चालविणे ही काळाची गरज आहे आणि आपली घरी कोणीतरी वाट पहात आहे हे लक्षात घेऊन गाडी नीट चालवून रोड चे सर्व नियम काटेकोर पणे पाळावेत अशी विनती केली .
सागर तुपे यांनी कोरोना काळात रोड सुरक्षा म्हणून काळजी कशी घ्यावी या विषयी सुरक्षित
ड्राईविंग आणि त्याच्या महत्वपूर्ण टिप्स सागून मौलिक मार्गदर्शन करून कोव्हिड 19 चे अजूनही संकट दूर झालेले नाही तरी सर्वांनी माझे कुटुब माझी जबाबदारी हे लक्षात घेऊन काळजी घ्यावी.
दीपक गुदेचा यांनी पक्षविरहित भारत विकास परिषद काम करीत असून अपंग लोकनसाठी मोफत आरोग्य शिबीरे तसेच गेली अनेक वर्षापासून जयपूर पाय व हात मोफत देत आहोत.आणि मोतीलाल शहा यांचे मदतीने मोफत व्हीलचेअर व तीन चाकी सायकल वाटप करीत असतो .
आज च्या 34 शिबिरातीना अध्यक्ष चंद्रकांत दर्डा,प्रणव ताम्हणकर ,सुविधा नाईक व इतर मान्यवरांचे हस्ते रेशन किट (तादूळ,गव्हाचे पीठ,तेलाची पिशवी व तुरडाळ प्रत्येकी १किलो ) ,प्रत्येकास मास्क , हातमोजे ,sanitizer bottle देण्यात आले.तसेच सर्वांच्या गाड्यांना आतून sanitizer करून दोन्ही सिट chya मधे palstic शीट लावून दिले.सर्वाना प्रशिक्षण पुर्ण केले म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रसंगी सेक्रेटरी सुविधा मॅडम व सभासद विनया शाह मॅडम ह्यांना दैनिक पुढारी तर्फे नवदुर्गा पुरस्कार मिळाल्या बदल विशेष सत्कार करण्यात आला.शिबार्थी म्हणून रेखा आखाडे ,शैलेश शाह,विधाटे मनोगत व्यक्त केले .तर मोलाचे सहकार्य जयश्री शिंदे व संभव फौन्डेशन ने सर्व साहित्य मोफत वाटप केले .कार्यक्रमाचे स्वागत प्रास्थाविक चंद्रकांत दर्डा व सूत्रसंचालन जयश्री शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे शेवटी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौन्डेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी आभार मानले.