कोरोनाच्या संकट काळात सुरेगावात चोरट्यांची किराणा मालावर संक्रात !!


कोरोनाच्या संकट काळात सुरेगावात चोरट्यांची किराणा मालावर संक्रात !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

सुरेगाव वार्ताहार - कोरोनाच्या जगव्यापी संकटकाळात गावोगावी किराणा मालाच्या दुकानातील चोरीचे प्रकार वाढतच आहेत.सुरेगाव परीसरात या अगोदर असे प्रकार घडले असताना

रविवारी (दि.२५ ऑक्टोबर) रोजी रात्री सुरेगाव मधील एक किराणा दुकान फोडून चोरट्यांनी किराणा मालासह  गल्ल्यातील रोख रक्कम चोरली आहे .

       याबाबत माहिती अशी की, रविवारी रात्रीच्यावेळी गावातील सुरेगाव रोड वरील विलास वाबळे यांच्या मालकीचे मातोश्री किराणा दुकानचे शटर तोडुन आज्ञात चोरट्यांनी दुकानातून काही किराणा माल  व गल्ल्यातील रोख रक्कम ३ ते ४  हजार रुपये असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे व काही किराणा मालाची नासाडी केल्याचे सकाळी निर्दनास आले. पोलिसांनी सदर घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

     दिवाळीचा सण जवळ आल्याने नागरीकांची किराणा मालाची खरेदी सुरू झाली आहे तसेच व्यापारी वर्गही किराणा इत्यादी माल अधिक प्रमाणात विक्रीसाठी ठेवत असल्याने चोरटयांना हात साफ करण्याची संधी मिळत आहे. या पाश्र्वभुमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी कर्मवीर कारखान्याचे संचालक राजेंद्र मेहेरखांब यांनी केली असुन गावातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावे अशी मागणी देखील व्यापारी वर्गाने स्थानिक ग्रामपंचायतीकडे केली आहे.काही दुकानांचा अपवाद वगळता काही दुकानात सी.सी. टिव्ही कॅमेरे नसल्याने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News