नगरमध्ये बेकायदेशीर डिझेल वाहतूक करणारे दोन टॅकर पकडले.


नगरमध्ये बेकायदेशीर डिझेल वाहतूक करणारे दोन टॅकर पकडले.

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) बेकायदेशीर डिझेल वाहतूक करणारे दोन टॅकर पकडले असून,एकूण 13 लाख 45 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक केली आहे. नगर शहरातील जीपीओ चौकाजवळील छावणी कॉम्प्लेक्स मधील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दुकानाचे पाठीमागील बाजूस सुलभ शौचालयासमोर विशेष पोलिस पथकानेही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आरोपी गौतम वसंत बेळगे (वय 37 रा. भगवानबाबा चौक भिंगार अहमदनगर) हा दि.26 ऑक्टोबर रोजी 5.30 वाजण्याच्या सुमारास जीपीओ चौकाजवळील छावणी कॉम्प्लेक्स मधील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दुकानाचे पाठीमागील बाजूस सुलभ शौचालय समोर 13 लाख,45 हजार 275 रुपये किमतीचा माल टँकर (एम एच 17 ,AG16 38), ट्रक (एमएच 16 , T 0999) असे असलेले वाहनांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा टॅंकरमधून ट्रकमध्ये डिझेल टाकून व बेकायदा ट्रक व टँकरमध्ये बेकायदेशीरपणे साठा स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळवून आला. याप्रकरणी विशेष पोलिस पथकातील पोना अरविंद रमेश भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 285 सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक डाॅ दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सपोनि प्रविण पाटील हे करीत आहे.

 पोलीस उपनिरीक्षक सुनील सुर्यवंशी, पोलीस कर्मचारी गणेश डहाळे, भरत डंगोरे,राजू चव्हाण अरविंद भिंगारदिवे अजित घुले, संदिप धामणे यांनी ही कारवाई केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News