Sc आरक्षण वर्गीकरण महापुरुषांचे चे सामाजिक न्यायचे स्वप्न पूर्ण करेल !!अँड.नितीन पोळ


Sc आरक्षण वर्गीकरण महापुरुषांचे चे सामाजिक न्यायचे स्वप्न पूर्ण करेल !!अँड.नितीन पोळ

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव -Sc आरक्षण वर्गीकरणा साठी उभारलेला लढा हा महापुरुषांचे सामाजिक न्यायचे स्वप्न पूर्ण करेल असा आशावाद लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केला 

Sc आरक्षण वर्गीकरण व्हावे म्हणून आरक्षणा पासून वंचित असलेल्या जातींनी दहा लाख सह्यांच्या मोहिमेची सुरुवात कोपरगाव येथे नुकतीच करण्यात आली 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांती गुरू सोशल फाउंडेशन चे दिपक आरणे यांनी केले या प्रसंगी बोलताना पोळ पुढे म्हणाले की शोषण मुक्त समाज निर्मिती साठी अनेक महापुरुषांचे योगदान असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेत सामाजिक न्याय व समता प्रस्तापित व्हावी म्हणून नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहेत मात्र स्वातंत्र्य नंतर सातत्याने अनुसूचित जाती मधील अनेक जातींचे मूलभूत हक्क पायदळी तुडवले गेले त्यामुळे अनेक जाती आरक्षणाच्या हक्का पासून वंचित राहिल्या आहेत व त्या मुळे या जात समूहामध्ये मोठी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दरी निर्माण झाली असून या वंचित जातींचा सामाजिक दर्जा समान करायचा असेल तर त्यांना विशेष सवलत द्यावी ही मागणी या वंचित जाती कडून होत असून त्या करिता अनेक सामाजिक संघटना अनेक दिवसांपासून कार्यरत आहे मात्र सरकार त्यांच्या मागणी कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असून नुकताच सर्वोच्च न्यायालयाने या बाबत अनुकूल निकाल दिला आहे त्या मुळे  sc आरक्षण व्हावे या मागणी साठी विविध वंचित समाज संघटनांची कृती समिती स्थापन केली असून या माध्यमातून दहा लाख सह्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे 

या मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला या कार्यक्रमास संदीप अभंग,संतोष खैरनार,विलास अभंग, मंगेश जाधव,किरण सोळसे,सुनील खैरनार,दीपक खैरनार,दीपक आरणे,विकी खैरनार, शुभम खैरनार,अविनाश चव्हाण,संतोष आरणे, आकाश पोळ,राहुल अभंग आदी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News