भीम आर्मीचे प्रमुख भाई ऍड चंद्रशेखर आजाद (रावण) यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी : उत्तरेश्वर कांबळे


भीम आर्मीचे प्रमुख भाई ऍड चंद्रशेखर आजाद (रावण) यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी : उत्तरेश्वर कांबळे

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी,   

देशभरात चर्चेत असलेले अग्रेसर नाव म्हणजे भीम आर्मीचे व आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद हे सध्या बिहार येथे चालू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची करिता निवडणुकीच्या रणांगणात प्रचारासाठी उतरले आहेत. प्रचारासाठी बिहारच्या ठिकाणी भागात रॅली काढत असून त्यांच्या रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांचे धाबे दणाणले असुन अशातच बुलंद शहर विधानसभा निवडणुकी करीता ते आझाद समाज पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असतात त्यांच्या गाडीवर अज्ञात इसमाने गोळीबार केला त्यातून ते सहीसलामत बचावले सदर घटनेचा भीम आर्मी संघटना शब्दात निषेध व्यक्त करीत असून भीम आर्मी चे प्रमुख तथा आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष भाई एडवोकेट चंद्रशेखर आझाद यांना केंद्र सरकारने तात्काळ  झेड प्लस सुरक्षा पुरवावी अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्याकडे केली आहे.  तसेच त्यांच्यावर बुलंद शहरा मध्ये झालेल्या हल्ल्याची त्वरित उच्चस्तरीय चौकशी करावी या पाठीमागील मास्टर मांडला त्वरित शोध लावून त्याला शिक्षा देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी श्री कांबळे यांनी निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास भीम आर्मी राज्याभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले आणी त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असेल असे उत्तरेश्वर कांबळे म्हणाले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News